आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ड्रग्ज कनेक्शनमध्ये आणखी एक मोठे नाव:दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकरनंतर आता एनसीबीच्या रडारवर दीया मिर्झा, एनसीबी चौकशीत ड्रग पेडलरचा खुलासा - तिच्या मॅनेजरने ड्रग्ज खरेदी केले होते

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
रिपोर्ट्सनुसार, अनुज केशवानीची गर्लफ्रेंड दीया मिर्झाची मॅनेजर होती. 
  • ड्रग्ज पेडलर अनुज केशवानीने आपल्या जबाबात दीया मिर्झाचे नाव घेतले आहे.
  • केशवानीने ड्रग्ज प्रकरणात दीयाविरूद्धचे पुरावेही एनसीबीला दिले आहेत.

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोेण आणि नम्रता शिरोडकर यांच्यानंतर आता दीया मिर्झाचे नाव समोर आले आहे. वृत्तानुसार, ड्रग पेडलर अनुज केशवानीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)च्या चौकशीत 38 वर्षीय दीया मिर्झाच्या नावाचा उल्लेख केला आहे.

  • तपास यंत्रणा लवकरच समन्स पाठवू शकते

रिपोर्ट्सनुसार अनुज केशवानीने एनसीबीला सांगितले की, दीया मिर्झाची मॅनेजर ड्रग्ज खरेदी करत असे. 2019 मध्ये दीयाच्या मॅनेजरने ड्रग्ज खरेदी केल्याचे पुरावेही केशवानीने दिले आहेत. मॅनेजर ड्रग पॅडलरला दोनदा भेटली होती. येत्या काही दिवसांत दीयाच्या मॅनेजरला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर एनसीबी स्वत: दीयाला समन्स पाठवू शकते.

  • 'उडता पंजाब'च्या सह-निर्मात्याचे नावसुद्धा आले समोर

ड्रग्ज कनेक्शनमध्ये आता क्वीन या चित्रपटाचा निर्माता आणि उडता पंजाबचा सहनिर्माता मधु मांटेनाचे नावही समोर आले आहे. सुशांत सिंह राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया साहाने एनसीबी चौकशी दरम्यान चित्रपट निर्माता मधु मांटेनाचे नाव घेतले आहे. बॉलिवूडला ड्रग्ज पुरवणाऱ्यांशी मधु मांटेनाचे जवळचे संबंध असल्याचे तिने एनसीबीला सांगितले आहे. या प्रकरणी एनसीबीकडून चित्रपट निर्मात्याला समन्स बजावण्यात आल्याने आता त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. उद्या त्याला चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

मधु मांटेना हा ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता. फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताचे मधु मांटेनासोबत लग्न झाले होते. मात्र 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. मधु मांटेनाने ‘रण’, ‘गजनी’, ‘मौसम’, ‘क्वीन’सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

  • सोमवारी दीपिकाचे नाव आले समोर

सोमवारी दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचे व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आले. ड्रग्जबाबत हे चॅट्स 28 ऑक्टोबर 2017 चे आहेत. यात ‘डी’ हा काेडवर्ड दीपिकासाठी असल्याचे सांगितले जाते. एका चॅनलच्या दाव्यानुसार, चॅटमध्ये दीपिका “के’ला “माल’बाबत विचारते. ती उत्तरते, हे तिच्याकडे आहे, मात्र घरी ठेवलेले आहे. नंतर “के’ म्हणते की ती तिला काय हवे आहे ती 'अमित’ला विचारू शकते. दीपिका स्पष्ट करते की तिला 'हॅश” हवे आहे, 'वीड’ नव्हे.

दीपिकाची मॅनेजर म्हणून काम करणारी करिश्मा प्रकाश 'क्वान' नावाच्या सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीत काम करते. ही कंपनी 40 हून अधिक बॉलिवूड सेलिब्रिटींना टॅलेंट मॅनेजर पुरवते. रिया चक्रवर्तीची मॅनेजर जया साहा ही देखील याच कंपनीत काम करते. जया करिष्माची सीनिअर आहे. एनसीबी, सीबीआय आणि ईडीच्या पथकाने अनेकदा जयाची चौकशी केली. चौकशीदरम्यान एनसीबीला जया आणि करिश्मा यांच्यातील चॅटसंदर्भात माहिती मिळाली. यानंतर हे प्रकरण दीपिकापर्यंत पोहोचले. याप्रकरणी दीपिकालासुद्धा समन्स पाठवले जाऊ शकते.

दीपिका, दीया आणि मधु यांच्याव्यतिरिक्त, ड्रग्ज कनेक्शनमध्ये रकुल प्रीत सिंग, सारा अली खान, नम्रता शिरोडकर आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांची नावेही समोर आली आहेत.