आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाउंसमेंट ऑफ द डे:'जवान'मध्ये नव्या अंदाजात दिसणार SRK, दिग्दर्शक अ‍ॅटलीच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, बघा TEASER

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा शाहरुख खानचा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणार आहे.

अभिनेता शाहरुख खान ब-याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर होता, मात्र आता तो पठाण आणि डंकी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. या दोन चित्रपटानंतर आता त्याच्या तिस-या अॅक्शन पॅक्ड चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. जवान हे शाहरुखच्या आगामी चित्रपटाचे नाव असून यात त्याचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

नुकतीच रेड चिलीज एंटरटेन्मेंटने शाहरुख खान स्टारर 'जवान' या मोठ्या अ‍ॅक्शन एंटरटेनर चित्रपटाची घोषणा करत त्याचा टीझर रिलीज केला आहे. अ‍ॅटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

अ‍ॅटली यांनी दक्षिणेत अनेक यशस्वी ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. यामध्ये राजा राणी, थेरी, मेर्सल आणि बिगिल यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आता अ‍ॅटली बहुप्रतिक्षित 'जवान' या चित्रपटातून आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गेल्या काही दिवसापासून या चित्रपटाबाबत अनेक अंदाज बांधले जात होते. टीझर रिलीज करत निर्मात्यांनी प्रेक्षकांना जणू ट्रीटच दिली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरुख खानला रफ बॅकग्राउंडवर, जखमी अवस्थेत दाखवण्यात आले आहे. त्याच्या चेह-यावर पट्टी लावलेली दिसतेय. चित्रपटाचा फर्स्ट लूक आगामी काळासाठी टोन सेट करणारा असून हा लार्जर दॅन लाइफ अ‍ॅक्शन एंटरटेनर चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये 2 जून 2023 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला, "जवान ही एक सार्वत्रिक कथा आहे जी भाषा, भौगोलिकतेच्या पलीकडे आहे आणि सर्वांच्या आनंदासाठी आहे. हा अनोखा चित्रपट बनवण्याचे श्रेय अ‍ॅटली यांना जाते, माझ्यासाठी देखील हा शानदार अनुभव होता. कारण मला अ‍ॅक्शन चित्रपट आवडतात. टीझर ही फक्त एक सुरुवात आहे आणि पुढे काय होणार आहे याची झलक देतो." ​​​​

जवानबद्दल बोलताना, दिग्दर्शक अ‍ॅटली म्हणाले, “जवानमध्ये प्रत्येकासाठी काही ना काहीतरी खास आहे, मग ती अ‍ॅक्शन असो, इमोशन्स असो, ड्रामा असो, सर्व काही एकत्र करून एक व्हिज्युअल ट्रीट बनवण्यात आली आहे. मला प्रेक्षकांना एक असाधारण अनुभव द्यायचा आहे, जो पहिला कधीच सादर झाला नाहीये. एक असा चित्रपट ज्याचा सर्वजण एकत्र आनंद घेऊ शकतील आणि यासाठी शाहरुख खानपेक्षा अधिक चांगला कोण असू शकेल."

जवान रेड चिलीज एंटरटेनमेंट सादर करत आहे. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत असून गौरी खान निर्मित आहे. जवान 2 जून 2023 ला पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, हा शाहरुख खानचा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणार आहे.

या चित्रपटाच्या घोषणेसह, शाहरुख खान पुढील वर्षी 'डंकी', 'पठाण' आणि आता 'जवान' या तीन चित्रपटांसह प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...