आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर अटॅक:तब्बूचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक, चाहत्यांना केले सतर्क; म्हणाली - कृपया माझ्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करु नका

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तब्बूने तिच्या अकाउंटवर आलेली एक फेक पोस्ट डिलीट केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. रविवारी स्वत: तब्बूने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करुन ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. तब्बू सांगितल्यानुसार, तिच्या अकाउंटवरुन काही प्रमोशनल पोस्ट्स शेअर केल्या गेल्या आहेत, ज्याची माहिती तिला नव्हती. याशिवाय तिने चाहत्यांना सतर्क करताना तिच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका, असे सांगितले आहे. तब्बूने तिच्या अकाउंटवर आलेली एक फेक पोस्ट डिलीट केली आहे. या फेक पोस्टमध्ये एका तासात दररोज 2 ते 5 हजार रुपये कमावण्याची माहिती देण्यात आली होती.

तब्बूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये सांगितले की, ‘माझे अकाउंट हॅक झाले आहे. कृपया माझ्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका.’

तब्बूपूर्वी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हॅकिंगला बळी ठरले आहेत. अलीकडेच शरद केळकर, अमिशा पटेल, ईशा देओल, फराह खान, विक्रांत मैसी, सुष्मिता सेनची मुलगा रेने, उर्मिला मातोंडकर आणि सुझान खान यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले होते.

तब्बू 'भूल भूलैय्या 2' मध्ये दिसणार आहे
वर्क फ्रंट बद्दल बोलायचे तर तब्बू लवकरच 'भूल भूलैय्या 2' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तब्बू व्यतिरिक्त कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी हे देखील मुख्य भूमिका साकारणार आहेत. अनीस बज्मी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तब्बूचा शेवटचा आलेला चित्रपट म्हणजे 'जवानी जानेमन'. यात ती सैफ अली खान आणि आलिया फर्निचरवाला यांच्यासोबत झळकली होती. तब्बूने 1985 मध्ये 'हम नौजवान' या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. या चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...