आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • After Getting The Abortion Done In 2014, There Was A Rift In The Relationship Between Karan Nisha, Said – I Do Not Want Money, Only The Custody Of The Son

वादात कपल:2014 मध्ये गर्भपात केल्यानंतर करण-निशाच्या नात्यात निर्माण झाला होता दुरावा, म्हणाली - 'मला पोटगी नको केवळ माझ्या मुलाचा ताबा हवाय'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलगा काविशच्या वाढदिवशी (18 जून) करण शेवटचा त्याच्याशी बोलला होता.

छोट्या पडद्यावरील ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैतिकची भूमिका वठवणारा अभिनेता करण मेहरा सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे वादात सापडला आहे. त्याची पत्नी निशा रावल हिने 1 जून रोजी करणविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर करणला अटकदेखील झाली होती. जामीन मिळाल्यानंतर निशाने स्वतः भिंतीवर डोके आपटले होते, असा खुलासा त्याने केला होता. करणचे दुसऱ्या मुलीसोबत संबंध असल्याचे सांगत निशाने घटस्फोटाची मागणीदेखील केली. आता निशाने तिला करणकडून पोटगी नको असल्याचे म्हटले आहे. त्याबदल्यात निशाने फक्त तिच्या मुलाचा ताबा मागितला आहे.

2014 मध्ये गर्भपात केल्यानंतर नात्यात वितुष्ठ निर्माण झाले
निशाने अलीकडेच ई टाइम्सशी केलेल्या बातचीतमध्ये सांगितले, "2014 मध्ये जेव्हा मला गर्भपात करावा लागला तेव्हापासून आमचे संबंध बिघडू लागले. बाळात एबनॉर्मेलिटीज होत्या आणि त्याच्या हृदयात तीन छिद्रे होती. त्यामुळे त्यावेळी मला गर्भपात करावा लागला होता. मी माझ्या मुलाला गमावल्यानंतर जेव्हा या कठीण प्रसंगातून जात होते आणि मला करणची गरज होती, तेव्हा तो माझ्याबरोबर नव्हता. मी मे 2016 मध्ये डिप्रेस होती, माझी थेरपी तीन महिने चालली. जेव्हा जेव्हा मला हे नाते तोडायचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा तो त्याच्या वागण्याबद्दल माफी मागायचा आणि पुन्हा चूक करणार नाही, असे सांगायचा. मी त्याच्यावर प्रेम केले म्हणून मी त्याला माफ करत असे.'

मला पोटगी नकोय
यापूर्वी निशाने पोटगी म्हणून फार मोठी रक्कम मागितली असल्याचा दावा करणने केला होता. निशाने यावर उत्तर दिले आहे. ती म्हणाली, 'माझ्या वकिलांनी करणला एक मेल पाठवला आहे. त्यात त्यांनी मला पोटगी नको असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. मला फक्त माझ्या मुलाचा ताबा हवा आहे. कवीश माझ्यासोबत राहील. करण त्याला कधीही भेटायला येऊ शकतो. पण करणला ते मान्य नाही. करण यासाठी तयार होत नाहीये.'

माझे दागिने करणजवळ आहेत
निशा म्हणाली, 'माझे सगळे दागिने करणने घेतलेत. माझ्या आईच्या जमिनीची कागदपत्रदेखील करणकडे आहेत. मी खूप कमी वयात पैसे कमवायला सुरुवात केली होती. त्यामुळे करणने मला पैसे द्यावे अशी माझी मुळीच अपेक्षा नाहीये. त्याने फक्त माझ्या वस्तू मला परत कराव्यात. करणला मुलाचा ताबा हवा आहे पण गेले कित्येक दिवस त्याने स्वतःच्या मुलाला एक फोनही केलेला नाही. तो मुलाला भेटायला देखील आलेला नाही. मला स्वतःची आणि माझ्या मुलाची काळजी घेता येते. मला त्याचे पैसे नकोत. माझा मुलगा मात्र मला हवा आहे.'

निशाने पुढे सांगितले आहे की, मुलगा काविशच्या वाढदिवशी (18 जून) करण शेवटचा त्याच्याशी बोलला होता, तेही त्याच्या मित्राच्या मोबाइलवरून. त्यानंतर करणने त्याला कधीही फोन केला नाही.

बातम्या आणखी आहेत...