आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन:नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चित्रपटांच्या रिलीजचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर धडाका, ‘घूमकेतू’नंतर आता या दोन चित्रपटांची मिळणार ट्रीट 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवाजुद्दीन सिद्दीकीचे आणखी दोन चित्रपट थिएटरऐवजी डिजिटली रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लॉकडाऊनमुळे मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणार असल्याची घोषणा झाली आहे. नवाजुद्दीन सिद्दिकीचा चित्रपट ‘घूमकेतू’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर 22 मे रोजी प्रदर्शित झाला आहे.

पुष्पेंद्र नाथ मिश्रा दिग्दर्शित या चित्रपटात नवाजसह अनुराग कश्यप, इला अरुण, रघुबीर यादव आणि स्वानंद किरकिरे यांच्या महत्त्वाच्या भूमिका ‘घूमकेतू’ आहेत. नवाजुद्दीनने चित्रपटात घुमकेतू नावाच्या व्यक्तीचे पात्र साकारले असून त्याची लेखक व्हायची इच्छा असते. या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. 

'घूमकेतू' हा चित्रपट 22 मे रोजी झी 5 वर रिलीज झाला आहे.
'घूमकेतू' हा चित्रपट 22 मे रोजी झी 5 वर रिलीज झाला आहे.
  • ‘बोले चुडियाँ’ डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

आता त्याचा अजून एक चित्रपट ‘बोले चुडियाँ’देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्माता राजेश भाटिया यांनी घेतला आहे. ज्यांच्यासोबत डील सर्वांत जास्त फायदेशीर होईल त्याच प्लॅटफार्मवर चित्रपट प्रदर्शित होईल. यामध्ये नवाजसोबत तमन्ना भाटिया दिसणार आहे. हा एक रोमँटिक विनाेदी चित्रपट आहे. यात बांगड्या विक्रेत्याची कथा आहे. जो नंतर स्वत:च बांगड्या बनवण्याचा कारखाना सुरू करतो. चित्रपटात सुरुवातीला तमन्नाऐवजी मौनी रॉयला घेण्याचा विचार झाला होता. पण नंतर तमन्नाची वर्णी चित्रपटात लागली. हा चित्रपट नवाजचा भाऊ शमास नवाब सिद्दीकीने दिग्दर्शित केला असून त्याचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच अनुभव आहे. 

बोले चुडियामध्ये तमन्नासोबत रोमान्स करताना दिसणार नवाजुद्दीन सिद्दीकी
बोले चुडियामध्ये तमन्नासोबत रोमान्स करताना दिसणार नवाजुद्दीन सिद्दीकी
  • ‘रात अकेली है’ या चित्रपटाचीही मिळू शकते ट्रीट

नवाजुद्दीनचा क्राईम थ्रिलर सिनेमा ‘रात अकेली है’ वेबप्लॅटफॉर्मवर रिलीज व्हायची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हनी त्रेहन या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत. त्यामुळे हा चित्रपट रिलीजसाठी ते जास्त काळ वाट पाहू शकत नाहीत. नवाजुद्दीनसोबत या चित्रपटात राधिका आपटे आणि श्वेता त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.  

'रात अकेली है' या चित्रपटाचे पोस्टर
'रात अकेली है' या चित्रपटाचे पोस्टर
बातम्या आणखी आहेत...