आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज बब्बर यांचा 69 वा वाढदिवस:NSD मधून ग्रॅज्युएट होताच मिळाला होता चित्रपटांत ब्रेक, पहिली पत्नी नादिराला घटस्फोट न देता स्मिता पाटीलशी केले होते दुसरे लग्न

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटस्फोट न घेता स्मिता पाटील यांच्यासह केले होते दुसरे लग्न

नॅशनल स्लूक ऑफ ड्रामा (एनएसडी)च्या 1975च्या बॅचमधून असा एक अभिनेता बाहेर पडला, ज्याने रंगभूमीवरुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि स्वतःची यशस्वी कारकिर्द घडवली. त्या अभिनेत्याचे नाव आहे राज बब्बर. आज त्यांचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 69 वर्षे पूर्ण केली आहेत. 23 जून 1952 रोजी उत्तरप्रदेशातील टुंडलामध्ये त्यांचा जन्म झाला.

एनएसडीतील फार कमी असे अभिनेते ज्यांनी बॉलिवूडमध्ये आपली व्यापक ओळख निर्माण केली. नसीरुद्दीन शाह आणि ओमपुरी यांच्यानंतरच्या पीढीत राज बब्बर असे अभिनेते होते, ज्यांनी एनएसडीतील विद्यार्थ्यांना बॉलिवूडचा मार्ग दाखवण्याचे काम केले. इतकेच नाही तर एनएसडीतून बाहेर पडल्यानंतर बॉलिवूडमध्ये हीरोच्या रुपात ब्रेक मिळवणारे राज बब्बर पहिले अभिनेते होते, हे फार कमी जणांना ठाऊक आहे. राज बब्बर यांनी त्याकाळात आपल्या समवयीन कलाकारांप्रमाणे कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून नव्हे तर सोलो हीरो म्हणून चित्रपटांत काम केले.

एका मुलाखतीत राज बब्बर यांनी सांगितले होते की, त्यांना अभिनयाची आवड बालपणापासूनच होती. ते कायम स्टेज शोमध्ये सादरीकरण करायचे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 150 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. जाणून घेऊयात राज बब्बर यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी...

1980 रिलीज झालेला 'इंसाफ का तराजू' या चित्रपटाद्वारे त्यांना पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली.
1980 रिलीज झालेला 'इंसाफ का तराजू' या चित्रपटाद्वारे त्यांना पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली.

'सौ दिन सास के'मधून मिळाला ब्रेक...
राज बब्बर यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक एनएसडीमधून पदवी प्राप्त केल्यानंतर लगेच मिळाला होता. त्यांचा पहिला चित्रपट 1980 मध्ये आलेला 'सौ दिन सास के' हा होता. या चित्रपटात त्यांच्यासह रीना रॉय प्रमुख भूमिकेत होत्या. 1980 रिलीज झालेला 'इंसाफ का तराजू' या चित्रपटाद्वारे त्यांना पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली. या चित्रपटात राज बब्बर यांनी रेपिस्टची भूमिका साकारली होती. यामध्ये शेवटी नायिका त्यांची गोळी मारुन हत्या करते. या चित्रपटानंतर राज बब्बर यांचे अनेक उत्कृष्ट सिनेमे रिलीज झाले. या चित्रपटांमुळे ते बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते ठरले. त्यांचा सुपरडूपर हिट सिनेमा बी. आर. चोप्रा यांचा 'निकाह' हा होता. राज बब्बर आजही बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. 'कॉरपोरेट', 'बॉडीगार्ड', 'कर्ज', 'फॅशन', 'साहब बीवी और गैंगस्टर' आणि 'बुलेट राजा', 'तेवर' या चित्रपटांमध्ये त्यांचे दर्शन मोठ्या पडद्यावर घडले.

राज बब्बर यांनी स्मिता पाटिलसोबत 1985 मध्ये लग्न केले होते. 1986 मध्ये स्मिता यांचे निधन झाले होते.
राज बब्बर यांनी स्मिता पाटिलसोबत 1985 मध्ये लग्न केले होते. 1986 मध्ये स्मिता यांचे निधन झाले होते.

स्मिता पाटील यांच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपला केली होती सुरुवात
बॉलिवूडमध्ये आज लिव्ह इन रिलेशनशिप सामान्य गोष्ट आहे. मात्र एकेकाळी बॉलिवूडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे हे खूप धाडसी पाऊल समजले जात होते. राज बब्बर यांनी समाज बंधनांना झुगारुन स्मिता पाटील यांच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे धाडस दाखवले होते. त्यावेळी या दोघांवरही बरीच टीका झाली होती. मात्र त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांच्यासोबत लग्न केले.

मुलगा आर्य, मुलगी जूही आणि पत्नी नादिरासोबत राज बब्बर
मुलगा आर्य, मुलगी जूही आणि पत्नी नादिरासोबत राज बब्बर

घटस्फोट न घेता स्मिता पाटील यांच्यासह केले होते दुसरे लग्न
स्मिता पाटील यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत राहणा-या राज बब्बर यांनी दोन लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नादिरा जहीर आहे. नादिरा आणि राज यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आर्य बब्बर आणि जुही बब्बर ही त्यांची नावे आहेत. राज बब्बर यांनी दुसरे लग्न स्मिता पाटील यांच्यासोबत केले. मात्र या दोघांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. पहिल्या बाळाच्या जन्मावेळी स्मिता पाटील यांचे निधन झाले. विशेष म्हणजे राज यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता स्मिता पाटीलशी दुसरे लग्न केले होते. स्मिता यांच्या निधनानंतर राज आपल्या पहिल्या पत्नीकडे परतले होते.

राजकारणातील प्रवेश
सिनेसृष्टीसोबत राज बब्बर राजकारणातही सक्रिय आहेत. चित्रपटांमध्ये मंत्र्यांच्या भूमिकेत झळकणारे राज बब्बर यांना राजकारणातही यश मिळाले. 14व्या लोकसभा निवडणुकीत ते फिरोजाबाद या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले. मात्र 2006 मध्ये हा पक्ष निलंबित झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

बातम्या आणखी आहेत...