आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:25,000 कामगारांना मदत केल्यावर आता सलमान खानने गरीब कुटुंबांसाठी ट्रकमध्ये भरुन रेशन पाठवले 

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमान खानने यापुर्वी लॉकडाऊनदरम्यान सिनेमा उद्योगातील 25 हजार कामगारांचा खर्च उचलणार असे सांगितले होते.

कोविड 19मुळे लॉकडाऊन दरम्यान फिल्म इंडस्ट्रीतील 25 हजार कामगारांचा खर्च उचलल्यानंतर सलमान खान आता गरीब कामगारांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. गरिबांसाठी ट्रक भरुन त्याने रेशन पाठवले आहेत जेणेकरून कुणीही उपाशीपोटी झोपणार नाही. सलमानने याविषयीची कोणताही गाजावाजा केला नाही, पण त्याचे मित्र बाबा सिद्दीकी यांनी ट्विटरवर गोडाऊनचा एक फोटो शेअर करुन रेशनने भरलेले ट्रक उभे असल्याची माहिती दिली.

बाबांनी हे छायाचित्र शेअर केले आणि लिहिले की, 'तुम्ही नेहमीच इतरांना मदत करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे असता आणि पुन्हा एकदा तुम्ही ते सिद्ध केले आहे. कोरोनाव्हायरसच्या युद्धात साथ दिल्याबद्दल आणि कुणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी घेतल्याबद्दल सलमान खानचे आभार.'

  • सलमानने 16 हजार कामगारांच्या खात्यात जमा केले पैसे

सलमान खानने यापुर्वी लॉकडाऊनदरम्यान सिनेमा उद्योगातील 25 हजार कामगारांचा खर्च उचलणार असे सांगितले होते. यासाठी त्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (एफडब्ल्यूआईसीई) कडून 19 हजार कामगारांच्या बँक खात्यांची माहिती मागितली होती. ती त्याला मिळाली असून त्याने त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. एफडब्ल्यूआईसीईचे महासचिव अशोक दुबे यांनी सांगितले की, सलमानने 25 हजार कामगारांची माहिती मागितली होती  आणि आम्हाला 19 हजार सदस्यांची माहिती मिळाली आहे. यातील तीन हजार कामगारांना अगोदरच यशराज फिल्म्सकडून पाच हजार रुपये मिळाले आहेत. म्हणून आम्ही उर्वरित 16000 कामगारांची माहिती सलमान खान यांना पाठवली आहे आणि त्याने पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच सर्वांना पैसे मिळतील.

बातम्या आणखी आहेत...