आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन मागील काही दिवसांपासून आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी सुझानसोबत घटस्फोटानंतर आता त्याला पुन्हा एकदा प्रेम गवसले आहे. सबा आझादसोबत हृतिक रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे त्याची पुर्वाश्रमीची पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर सुझान खान ही देखील अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.
विशेष म्हणजे हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलान अलीकडेच गोव्यात एकाच पार्टीत सहभागी झाले होते. गोव्याहून परतत असतात हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलान मुंबई विमानतळावर हातात हात घालून दिसले. या चौघांचे गोव्यातील पार्टीचेदेखील फोटो समोर आले आहेत, त्यात हे चौघेही एकत्र पार्टी एन्जॉय करताना दिसले. अभिनेत्री पूजा बेदी हिने या पार्टीचे इनसाइड फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सुझान आणि अर्सलान एकत्र दिसले
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुझान आणि अर्सलान विमानतळाच्या पार्किंग एरियामध्ये दिसत आहेत. गाडीपर्यंत पोहोचेपर्यंत दोघांनी एकमेकांचा हात सोडला नाही. व्हिडिओमध्ये सुझान तिच्या बॉयफ्रेंडसोबत आनंदी दिसतेय.
सुझानच्या रेस्तराँच्या ओपनिंगमध्ये सहभागी झाले सेलेब्स
हृतिक, सबा आझाद, सुझान खान आणि अर्सलान गोनी गोव्यात सुझानच्या रेस्तराँच्या ओपनिंग पार्टीत सहभागी झाले होते. याशिवाय पूजा बेदी, माणेक कॉन्ट्रॅक्टर, फराह खान अली, डीजे अकील, झायेद खान, दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि अनुष्का रंजन यांच्यासह अनेकांनी पार्टीला हजेरी लावली.
मित्रांनी फोटो शेअर करुन दिल्या शुभेच्छा
पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर पार्टीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये पूजा हृतिक आणि सबासोबत पोज देताना दिसली. त्यावर तिने लिहिले, "काल रात्रीबद्दल @vedro.goa" फोटोमध्ये हृतिकने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि सबाने पिंक कलरचा ड्रेस घातलेला दिसत होता.
पूजाने सुझान आणि अर्सलानसोबतचे फोटोही इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर केले आहेत. माणेक, फराह आणि डीजे अकीलसोबत पोज देताना पूजाने लिहिले, "जवळचे मित्र आशीर्वादासारखे असतात." एक ग्रुप फोटो शेअर करताना सुझानची मैत्रीण भाविनी शेठने लिहिले, "वेड्रोच्या ओपनिंगसाठी सुझीचे अभिनंदन."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.