आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जेष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनीही बॉलिवूडच्या बचावासाठी मैदानात उतरल्या आहेत. त्या म्हणाल्या की, मला खूप दुःख होते, जेव्हा लोक ड्रग्ससारख्या गोष्टींवरुन बॉलिवूडविषयी वाईट गोष्टी बोलतात. यासोबतच त्यांनी नाव न घेता कंगना रनोटवर निशाणा साधला आहे. हेमा यांनी जया बच्चन राज्यसभेत बोलल्यानंतर याविषयी भाष्य केले आहे. ज्यामध्ये जया म्हणाल्या होत्या की, केवळ काही वाईट लोकांमुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करु शकत नाही.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कपड्यांवरील डागांशी बॉलिवूडवरील आरोपांची तुलना करता हेमा म्हणाल्या, 'हे जे ड्रग्सविषयी जे बोलले जात आहे ते प्रत्येक ठिकाणी असते. हे आजकाल खूप पसरले आहे. आपल्या इंडस्ट्रीत थोडे फार आले असेल. जसे कपड्यावर एखादा डाग लागतो, परंतु धुवून तो दूर होतो. त्याच प्रकारे, ते देखील धुण्याची मोठी आवश्यकता आहे. पण आपली इंडस्ट्री खूप चांगली आहे आणि सुंदर आहे'
कंगनाविषयी म्हटले - तुझी एवढी हिंमत कशी झाली
कंगनाचे नाव न घेता हेमा म्हणाल्या की, 'ज्यांच्यात इतकी हिम्मत नव्हती, ते आजकाल कोणत्याही गोष्टीबद्दल बोलत आहेत, कोणत्याही कलाकाराविषयी बोलत आहेत, हे पाहून खूप दुःख होते. आपले मोठे-मोठे कलाकार ज्यांनी येथे काम करुन आपले नाव कमावले आहे. त्यांच्याविषयी काहीही बोलले जात आहे. तुमची एवढी हिंमत कशी झाली. ही गोष्टी चुकीची आहे, तुम्ही त्यांचा सन्मान करायला पाहिजे.
तुम्ही संपूर्ण इंडस्ट्रीला दोष देऊ शकत नाही
हेमा पुढे म्हणाल्या की, 'मी अनेक वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये आहे. मला खूप प्रेम आणि नाव मिळाले आहे. जर आज कुणी इंडस्ट्रीविषयी वाईट बोलले तर मी पाहू शकत नाही.' हेमा म्हणाल्या, 'ड्रग अॅडिक्शनविषयी एखाद्याने काही म्हटले तर तुम्ही संपूर्ण इंडस्ट्रीला दोष देऊ शकत नाही, हे पूर्णपणे चुकीचे आहे. मला लोकांना सांगायचे आहे की, बॉलिवूड खूप सुंदर ठिकाण आहे आणि रचनात्मक जग आहे, हा कला आणि संस्कृतीचा उद्योग आहे.'
नेपोटिज्मने कोणी यश मिळवत नाही
नेपोटिज्मविषयी हेमा म्हणाल्या की, 'पहिलेही नेपोटिज्म सारखे काहीही नव्हते. आम्ही आमच्या दमावर पुढे आलो आहोत. मेहनत केली आहे, नाव कमावले आहे. सर्व कलाकार आपआपली ध्येय ठरवून येतात. कुणीही कोणाला बनवू शकत नाही, पण मेहनत करावी लागते. हो पण संधी ही देवाच्या कृपेनेच मिळते.'
'अनेक प्रोड्यूसर्सने मुलांन इंडस्ट्रीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. जर एखाद्या डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनतो, वकीलचा मुलगा वकील बनतो, त्याच प्रकारे फिल्म इंडस्ट्रीचे मुलंही आपल्या आई-वडीलांप्रमाणे फिल्डमध्ये येण्याची इच्छा ठेवतात, पण सर्वच यशस्वी होत नाही.'
संजय खान म्हणाले - बॉलिवूडने राजदूतप्रमाणे काम केले आहे
अॅक्टर संजय खान म्हणाले - 'जया बच्चनजी संसदेत जे बोलल्या ते बरोबर आहे. या संस्थेचे योगदान लक्षात घेतले पाहिजे. ज्याला आपण बॉलिवूड म्हणून ओळखतो. ही भारताची सुपर सॉफ्ट पावर आहे. बॉलिवूडने देशाविषयी सन्मान, प्रेम आणि आपुलकी वाढवण्याविषयी एका राजदूतप्रमाणे काम केले आहे.'
अनुभव सिन्हा यांनी लिहिले होते - पाठीचा कणा असा दिसतो
अनुभव सिन्हाने जया बच्चन यांचे समर्थन करत मुंगळवारी लिहिले होते, 'जयाजींना सादर प्रमाण पाठवत आहे, ज्यांना माहिती नाही त्यांना पाहून घ्या, पाठीचा कणा असा दिसतो.'
गुलशन दवैया म्हणाले - आम्हाला अपमान स्वीकार नाही
गुलशन दवैयाने जया बच्चन यांच्या समर्थनात म्हटले की, 'जेव्हा लोक अशाप्रकारे बॉलिवूडचे नाव घेतात तेव्हा अपमानित असल्याचे जाणवते. मला माहिती आहे की, मला हे मनावर घेतले नाही पाहिजे, कारण हे माझ्यासाठी नाही, मात्र ही घृणा अनावश्यक आणि असंवेदनशील आहे. मी आणि माझ्यासारखे हजारो कठोर मेहनत करणारे ईमानदार लोक येथे आहेत. तरीही असे वाटते की, आमच्यासाठी कोणतीही सहानुभूती उरलेली नाही. आम्हाला देशद्रोहीपासून राष्ट्रद्रोहीही म्हटले जात आहे. हे आम्हाला स्वीकार्य नाही.'
रणवीर शौरीने साधला जयांवर निशाणा
अभिनेता रणवीर शौरीने याप्रकरणी कोणाचेही नाव न घेता जया बच्चन यांचा विरोध केला. त्यांनी लिहिले की, 'जे लोक बॉलिवूडच्या वाईट गोष्टींच्या बचावात समोर आले आहे, ते एकतर 'गेटकीपर्स' आहेत, किंवा स्वतः ते घेत आहेत. जर तुम्हाला एखाद्याची व्हिसलब्लोइंग किंवा त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पसंत नसेल, तर तुम्ही तुमच्या स्वतंत्रतेचा उपयोग करण्यासाठी स्वतंत्र आहात. हे नका पाहू की गोंधळ कोणत्या गोष्टीमुळे होत आहे.'
अग्निहोत्रीने म्हटले - ताट अनेक लोकांकडे
विवेक रंजन अग्निहोत्रीने जया यांच्या 'ज्या ताटात जेवतात त्यातच छिद्र करतात' या वक्तव्याविषयी ट्विटमध्ये लिहिले की, 'पहिले गोष्ट ताट चांदीचे आहे, दुसरी गोष्ट, ताट केवळ मोजक्या लोकांकडे आहे. ताट ज्यांच्याकडे आहे ते राजा लोक आहेत किंवा त्यांचे युवराज. बाकी सर्व रंक आहेत. जेव्हा रंकांजवळ ताटच नाही तर ते त्यात छिद्र कसे करतील? आता ताटात छिद्र नाही, ताट बदलण्याची वेळ आली आहे. कदाचित यामुळेच भीती आहे.'
राजू श्रीवास्तव म्हणाले - ड्रग सिंडिकेटचा तपास व्हावा
राजू श्रीवास्तव यांनी एक व्हिडिओ जारी करत रविकिशनचे समर्थन केले आणि सरकारला अपील केली की, ड्रग्स सिंडिकेटचा तपास व्हावा. याची सफाई व्हायला हवी.
काय म्हणाल्या होत्या जया बच्चन
जया बच्चन म्हणाल्या की काही लोकांमुळे आपण संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा खराब करू शकत नाही. मला लाज वाटते की काल चित्रपटसृष्टीतील लोकसभेतील आमच्या एका सदस्याने त्याविरूद्ध भाषण केले. हे लाजीरवाणे आहे. आपण ज्या ताटात जेवतो त्यातच छिद्र करु शकत नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.