आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘कबीर सिंह’ या चित्रपटाच्या अपार यशानंतर शाहिद कपूरच्या खात्यात अनेक चित्रपट दाखल होत आहेत. नुकताच त्याचा 'जर्सी' येऊन गेला. त्याला बॉक्स ऑफिसवर 'कबीर सिंह'सारखे यश मिळाले नाही. चित्रपटात शाहिद अशा भूमिकेत होता, ज्याला मुलाच्या नजरेत सन्मान ढळू द्यायचा नाही. या चित्रपटानंतर तो पुन्हा एकदा आगामी 'ब्लडी डॅडी' चित्रपटात पित्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रीकरण पूर्ण झाले असून तो आता निर्मितीपूर्व स्थितीत आहे. सुत्रांनी सांगितले की, ‘शाहिद पित्याच्या भूमिकेत तर आहेच, सोबतच तो एक अंडरकव्हर कॉपसुद्धा आहे. मात्र त्याचा अंदाज ‘जर्सी’मधील पित्यासारखाच आहे. या ठिकाणी तो अॅक्शन अवतारात दिसणार आहे. पित्याच्या भूमिकेतील त्याचे पात्र आपल्या मुलाचे कसे रक्षण करते हे दाखवण्यात आले आहे.
गन फाइटपेक्षा जास्त हँड टू हँड फाइट करताना दिसणार शाहिद कपूर
चित्रपटात शाहिदची अनेक साहसदृश्ये आहेत. दिग्दर्शक आहेत, अब्बास जफर. त्यांनी ‘टायगर जिंदा है’ आणि ‘गुंडे’सारखे अॅक्शन चित्रपट बनवले आहेत. तेथे अॅक्शन लार्जर दॅन लाइफ होती. ‘ब्लडी डॅडी’मध्ये अली अब्बास यांनी अॅक्शन स्टाइल वेगळी ठेवली आहे. येथे शाहिद गन फाइटपेक्षा जास्त हँड टू हँड फाइट करताना दिसणार आहे. चित्रपटाची कथा दिल्ली आणि मुंबईमार्गे अबुधाबी असा प्रवास करते. दिल्लीच्या रस्त्यांपासून ते मुंबईतील गल्ली आणि अबुधाबीच्या उंच-उंच इमारतींवर शाहिदने स्वत:ची अॅक्शन साकारली आहे. त्याने डमी कलाकाराचा वापर केला नाही. शाहिदच्या चित्रपटात रनिंग सिक्वेन्सही आहेत. जसे की टॉम क्रूजच्या ‘मिशन इम्पॉसिबल’चे वेगवेगळे भाग होते.
शाहिदच्या मुलाच्या भूमिकेत ‘टायगर जिंदा है’ फेम सरताज
अबुधाबीतील चित्रीकरण अमिरात पॅलेसच्या हॉटेलमध्ये पूर्ण करण्यात आले. तेथे चित्रपटातील बहुतांश महत्त्वाची दृश्ये चित्रित झाली. तेथे मेकर्सनी 30 ते 35 दिवस चित्रीकरण केले. तर दिल्ली आणि मुंबईत 24 दिवस चित्रीकरण करण्यात आले. अली अब्बासही आपल्या गत चित्रपटातील पात्रांची पुनरावृत्ती करणाऱ्यांपैकी एक आहे. त्यांनी ‘टायगर जिंदा है’मधील सरताज कक्कडला याही चित्रपटात घेतले आहे. तो येथे शाहिदच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘टायगर जिंदा है’मध्ये तो सलमान खानच्या मुलाच्या भूमिकेत होता.
रोनित-संजय बनले खलनायक, राजीव असेल शाहिदचा मित्र
शाहिद आपल्या अपहृत मुलाला सोडवण्यासाठी धोकादायक मार्गावरून प्रवास करेल. अली अब्बास जफरने चित्रपटाचा सूर गंभीर ठेवला आहे. त्यात एकही गाणे नाही. एक गाणे आहे, मात्र बॅकड्रॉपमध्ये शाहिदचे पात्र आपल्या शत्रूंचा शोध घेताना दाखवले आहे. दृश्यात बादशहाचा कॉन्सर्ट सुरू असतो. सोबत शाहिदचे पात्र बॅकस्टेजमध्ये शत्रूंशी दोन हात करताना दिसते. अलींच्या कथा सत्य घटनांनी प्रेरित असतात. ‘टायगर जिंदा है’मध्ये याची प्रचिती आलीच आहे. येथे त्यांनी एका फिक्शन कथेवर चित्रपट बनवला आहे. सोबतच कथेचे धागेदोरे पाकिस्तान वा अबुधाबीतील दहशतवादी संघटनांसमवेत जोडलेले नाहीत. मुख्य खलनायकाच्या भूमिकेत रोनित रॉय आणि संजय कपूर आहेत. राजीव खंडेलवाल शाहिदच्या टीममध्ये आहे, मात्र त्याची बॅकस्टोरी वेगळी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.