आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना काळात शूटिंग:15 जूनपासून ‘गंगूबाई’, 16 पासून ‘आदिपुरुष’ आणि 18 जूनपासून ‘रक्षाबंधन'सारख्या मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण होणार सुरु

अमित कर्ण10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिने तज्ज्ञानुसार, 15 जूनपासून आणि नंतर मोठ्या चित्रपटांचे शूटिंग पुन्हा सुरु होणार आहे.

7 जूनपासून चित्रपट निर्मात्यांना सशर्त मुंबईत शूटिंग करण्याची परवानगी होती, परंतु आतापर्यंत फक्त यशराज बॅनरला आमिर खानचा मुलगा जुनैदचा पहिला चित्रपट महाराजाचे शूटिंग सुरु करण्यात यश आले आहे. हे शूटिंग मुंबईतील मारोल नाका येथे सुरु आहे. सिने तज्ज्ञानुसार, 15 जूनपासून आणि नंतर मोठ्या चित्रपटांचे शूटिंग पुन्हा सुरु होणार आहे. यात प्रथम गंगुबाई काठियावाडीचे शूटिंग सुरु होईल. त्यानंतर आदिपुरुषचे शूटिंग 16 जूनपासून तर रक्षाबंधचे 18 जूनपासून सुरु होणार आहे. एक व्हिलन 2 आणि पठान या चित्रपटांचेही चित्रीकरण सुरु होणार आहे.

यासाठी मेगाबजेट चित्रपटाची सुरुवात नंतर
फिल्म इंडस्ट्रीत मेगाबजेट चित्रपटाशी संबंधित जवळच्या सूत्रांनी सांगितले की, बिग बजेट चित्रपटांचे शूटिंग 15 जूनपुर्वी अशा प्रकारच्या प्रतिबंधांसह सुरु होऊ शकत नाही. कारण त्यांना मोठ्या संख्येने क्रू मेंबर्सची आवश्यकता असते. सध्याच्या शूट्सवरील निर्बंधामुळे, कोणत्याही प्रॉडक्शन हाऊसला क्रू मेंबर्सना बायोबबलमध्येच सेट्सवर आणावे लागणार आहे. तसेच शूट सुरु करण्यासाठी सेटवर जाण्यापूर्वी क्रू मेंबर्सना घरी किंवा हॉटेलमध्ये सात दिवस विलगीकरणासाठी पाठवावे लागेल.

सदस्यांना आधीच करुन घेतले होते तयार
आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा चित्रपट 'महाराजा'चे शूटिंग फक्त 20-25 क्रू मेंबर्सच्या उपस्थितीत सुरु आहे. बायोबबल शूटसाठी परवानगी जूनपासून मिळू शकेल असा निर्मात्यांचा अंदाज होता. त्यानुसार आधीपासूनच आपल्या क्रू मेंबर्सना वेगळे ठेवले होते. याव्यतिरिक्त यशराज बॅनरच्या 'टायगर 3' आणि 'पठाण' या दोन मोठ्या चित्रपटांच्या शूटिंगला 20 जूननंतर सुरुवात होणार आहे.

'आदिपुरुष'मध्ये लंकेशचा भाग बाकी
'आदिपुरुष'शी संबंधित अधिका-यांनी सांगितले की, आधी हैदराबादमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाची योजना होती. परंतु अद्याप तेथे परवानगी मिळाली नाही. परिणामी टीमने मुंबईतच शूट पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. असो, जरी टीम हैदराबादला गेली होती, तर प्रभासच्या भागाची तिथे शूटिंग होणार नव्हती. चित्रपटामध्ये फक्त लंकेशच्या भागाचे चित्रीकरण बाकी आहे, जे आता मुंबईत सैफसोबत होणार आहे.

अक्षय करेल 'रक्षाबंधन'चे चित्रीकरण
18 जूनपासून अक्षय कुमारच्या रक्षाबंधनच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. सेट फिल्मसिटीमध्ये मुंबईतील चाळीचा असल्याचे समजते. यापूर्वी झिरोच्या वेळी आनंद एल राय यांनी फिल्मसिटीत पुन्हा मेरठचा सेट उभारण्यासाठी प्रयत्न केले होते. रक्षाबंधनचे 40 दिवसांचे वेळापत्रक आहे.

'गंगुबाई' चित्रपटाचे 8 दिवसांचे काम बाकी
भन्साळी प्रॉडक्शन हाऊसच्या अधिका-यांनुसार, याचे चित्रीकरण 15 जूनपासून सुरु होईल. यासाठी जुनागडच्या सेट उभारणीचे काम फिल्मसिटीमध्ये सुरु करण्यात आले आहे. चित्रपटाचे आता केवळ आठ दिवसांचे चित्रीकरण बाकी आहे. यात गंगुबाईचे काही सीन चित्रीत केले जातील.

बातम्या आणखी आहेत...