आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवू़डमध्ये कोरोना परतला:करीना-अमृतानंतर आता महीप कपूर आणि सीमा खान कोरोना पॉझिटिव्ह, अलीकडेच अनेक पार्ट्यांमध्ये झाल्या होत्या सामील

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीना बीएमसीला संपूर्ण सहकार्य करत नसल्याची माहिती आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांच्यानंतर अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खान यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोघींचाही कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महीप कपूरमध्ये सौम्य लक्षणे असून तिला सर्दी आणि ताप आहे. महीपने स्वतःला आयसोलेट केले आहे. तसेच तिने गेल्या काही दिवसांत तिच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना त्यांची कोविड चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

रिपोर्ट्सनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी करीनाचे घर सील आले आहे. बीएमसीने करीना-अमृता यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना आरटी-पीसीआर चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. आता बीएमसीचे अधिकारी त्या सर्व लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत जे त्यांच्यासोबत पार्टीला गेले होते किंवा त्यांच्या संपर्कात आले होते. मात्र, करीना बीएमसीला संपूर्ण सहकार्य करत नसल्याची माहिती आहे. याआधी सोमवारी करीना आणि अमृता यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली होती. यानंतर काही वेळातच करीनाने तिच्या सोशल मीडिया स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून तिच्या संसर्गाची पुष्टी केली.

मी स्वतःला आयसोलेट केले आहे: करीना कपूर पोस्ट शेअर करताना करीना कपूरने लिहिले की, "माझी कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला आयसोलेट केले आहे आणि सर्व वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन करत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना विनंती करते की, त्यांनी कृपया स्वतःची कोविड-19 चाचणी करून घ्यावी. माझे कुटुंब आणि माझे कर्मचारी सर्व डबल व्हॅक्सीनेटेड आहेत. सध्या त्यांना संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मलाही बरे वाटत आहे. मी लवकरच पूर्णपणे बरी होईल."

करीना व्यतिरिक्त अमृता अरोरा हिने देखील स्वतःला आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसांत करीना आणि अमृता काही बॉलिवूड पार्ट्यांमध्ये सामील झाल्या होत्या. त्यामुळे त्या सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रिया कपूर आणि करण जोहरच्या पार्टीत झाल्या होत्या सहभागी

कोरोना नियमांचं उल्लंघन करून बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित राहिल्यामुळेच करीना आणि अमृता यांना करोनाची लागण झाल्याची चर्चा आहे. मुंबई महानगर पालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही अभिनेत्रींमुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघीही त्यांच्या गर्ल्स गँगसोबत पार्टी करताना दिसल्या होत्या. ही पार्टी अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूरच्या घरी देण्यात आली होती आणि त्यात मलायका अरोरा, करिश्मा कपूर, मसाबा गुप्ता या देखील सहभागी झाल्या होत्या.

याशिवाय करीना आणि अमृताने करण जोहरच्या पार्टीतही हजेरी लावली होती. यांच्यासह अर्जुन कपूर आणि आलिया भट्टसह अनेक सेलिब्रिटी करणच्या पार्टीत सहभागी झाले होते. आता महीप कपूर आणि सीमा खान देखील कोविड पॉझिटिव्ह असल्याने, या पार्टीत सामील झालेल्या व्यक्ती देखील कोरोनाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीएमसीने दोन्ही पार्टीत सहभागी झालेल्यांचा शोध सुरू केला आहे. त्याच्या संपर्कातील आणखी काही सेलिब्रिटींचे अहवाल लवकरच येऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...