आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोस्ताना 2:कार्तिकनंतर आता चित्रपटाच्या तंत्रज्ञ टीममध्ये बदल करणार करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन्स, आलिया-रणवीरचा नाव न ठरलेला चित्रपटही पुढे ढकलला

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तंत्रज्ञ टीममध्ये बदल होण्यामागे अक्षय असू शकतो मोठे कारण

करण जाेहरचा आगामी चित्रपट ‘दोस्ताना 2’ वादाच्या भाेवऱ्यात अडकत चालला आहे. धर्मा प्रॉडक्शनने आधी या चित्रपटातून कार्तिक आर्यनला काढले. आता या चित्रपटाच्या तंत्रज्ञ टीममधील काही लोकांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचे ऐकिवात आहे. यामुळे धर्मा बॅनरखाली बनत असलेला आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांचा चित्रपटही पुढे ढकलण्यात आला आहे. याचे दिग्दर्शन स्वत: करण जोहर करणार आहे. मात्र बातमी लिहेपर्यंत याविषयी कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही.

नवीन हीरोच्या आवडीची असेल तंत्रज्ञ टीम
धर्माशी जोडलेल्या लोकांनी सांगितले, चित्रपटाची तंत्रज्ञ टीम बदलण्याचेही एक कारण आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे 22 ते 25 दिवसांचे शूटिंग झाले आहे. शूटिंग गेल्या वर्षी कोरोना पसरण्याआधी एका हिल स्टेशनवर झाली होती. तेथे कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांच्यावर चित्रपटातील काही गाणे चित्रित केले गेले होते. आता नवीन हीरोसोबत हे दृश्य पुन्हा शूट केले जातील. प्रॉडक्शन हाऊस सध्या मेन हीरो शोधण्याकडे लक्ष देत आहे. नवी तंत्रज्ञ टीम नवीन हीरोच्या आवडीची ठेवली जाईल, असे बोलले जात आहे.

अक्षय असू शकतो मोठे कारण

खरं तर, चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी अक्षय कुमारचे नाव समोर आले आहे. अक्षयच्या कामाची पद्धत वेगळी आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. तो आपली टीम घेऊनच कोणत्याही प्रोजेक्टला हात घालतो. कारण ती टीम त्याच्यासोबत बऱ्याच वर्षापासून काम करत आली आहे. जेणे करुन शूटिंग, एडिटिंग, कोरियोग्राफी सर्व काही लवकरात लवकर पूर्ण होईल. त्यामुळे ‘दोस्ताना 2’ची तंत्रज्ञ टीम बदलण्याचे हे सर्वात मोठे कारण असू शकते.

करण आणि कार्तिकचे बरेच प्रोजेक्ट्स रखडले
सध्या कार्तिक आणि करण दोघांनाही व्यावसायिकरित्या तोटा साेसावा लागत आहे. एकीकडे कार्तिकची प्रमुख भूमिका असलेला ओम राऊतचा चित्रपट अडकला आहे, दुसरीकडे करणचाही चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. अाेमच्या चित्रपटाचे शूटिंग विदेशात हाेणार अाहे. त्याच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरू आहे. ओम सध्या आपल्या आगामी 'आदिपुरुष’ चित्रपटावर काम करत आहे. दुसरीकडे करणदेखील आलिया आणि रणवीरसोबत आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार होता, मात्र तसे झाले नाही. आता या चित्रपटाची शूटिंग जून-जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...