आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर एस प्रसन्नाचा आगामी चित्रपट:‘लालसिंह चड्ढा’नंतर आमिर स्पॅनिश चित्रपट ‘चॅम्पियन्स’च्या हिंदी व्हर्जनवर काम करणार

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा खेळावर आधारित चित्रपट असेल.

आमिर खान सध्या आपल्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करत आहे. दरम्यान त्याने आपल्या आगामी चित्रपटाचीही तयारी करणे सुरू केल्याचे ऐकिवात आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ फेम डायरेक्टर आर एस प्रसन्नासोबत आहे.

सूत्रानुसार, आमिर आणि प्रसन्ना 2018 मध्ये रिलीज झालेल्या स्पॅनिश चित्रपट ‘चॅम्पियन्स’वर सिनेमा बनवण्याचा विचार करत आहे. हा खेळावर आधारित चित्रपट असेल. त्यात आमिर एक दारुडा आणि अभिमानी कोचची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी आमिर आणि प्रसन्ना यांनी अनेकदा बैठका घेतल्या आहेत.‘लाल सिंह चड्ढा’च्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम संपल्यानंतर आमिर उन्हाळ्यापर्यंत यावर निर्णय घेणार आहे.

2018 मध्ये आलेला हा स्पॅनिश चित्रपट ‘चॅम्पियन्स’ बास्केटबॉलवर आधारित होता. हा चित्रपट देशभरातील बॉक्स ऑफिसवर हिट राहिला होता.

'लालसिंग चड्ढा'च्या रिलीजपर्यंत मोबाइल बंद ठेवणार आमिर

‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटच्या प्रदर्शनापर्यंत आमिरने त्याचा मोबाईल बंद ठेवण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे. ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या कामात व्यग्र असतात मोबाईलमुळे कोणताही त्रास होऊ नये म्हणून आमिरने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.

सोशल मीडिया टीम करणार हँडल

आमिरने नो फोन पॉलिसी सेटसह आपल्या वैयक्तिक जीवनातही लागू केली आहे. सोमवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याने कुटुंबासह आणि इतर जवळच्या लोकांना आवश्यक कामासाठी त्याच्या मॅनेजरशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. जेणेकरून कामात अडथळा येणार नाही. इतकेच नाही तर आमिरचे सोशल मीडिया अकाउंट्सही लालसिंग चड्ढाच्या रिलीजपर्यंत त्याची टीम सांभाळणार आहे.

ख्रिसमसला रिलीज होणार लालसिंग चड्ढा

आमिर खान लवकरच मुंबईला परतणार असून लालसिंग चड्ढाच्या शूटिंगला सुरुवात करेल. कोरोनामुळे वर्षभरापासून ठप्प पडलेल्या बॉक्स ऑफिसला रुळावर आणण्यासाठी केवळ चाहतेच नव्हे तर थिएटर मालकही लालसिंगच्या रिलीजची प्रतीक्षा करत असल्याची कल्पना आमिरला आहे.

लालसिंग चड्ढाच्या दिग्दर्शनाची धुरा अद्वैत चंदन यांच्यावर आहे. लवकरच चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शन सुरुवात होणार आहे. हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसला रिलीज होऊ शकतो. या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग आमिरसह महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...