आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर इंटरव्ह्यू:लता दीदींनंतर आता बप्पी दा यांच्या निधनाने दु:खी आहेत आशा भोसले, म्हणाल्या – एक गायिका आणि दुसरा संगीत निर्माता, दोघेही कायमचे निघून

उमेश कुमार उपाध्याय6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक गायिका आणि एक संगीत निर्माता, दोघेही 10 दिवसांत निघून गेले

स्वरा कोकिळा लता मंगेशकर यांच्यानंतर आता ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहरीही आपल्यात नाहीत. मंगळवारी (15 फेब्रुवारी) वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. पण त्यांचा आवाज, त्यांनी तयार केलेली अविस्मरणीय गाणी आणि त्यांच्याशी निगडीत आठवणी सदैव आपल्यासोबत राहतील. आता लता मंगेशकर यांची धाकटी बहीण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी दिव्य मराठीशी खास बातचीत करताना बप्पी लहरी यांच्याशी संबंधित अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, 'दीदींचा दहाव्याचा कार्यक्रम करुन मी नुकतीच बाणगंगेहून परतले आहे. आम्ही बप्पी लहरी यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ शकत नाही कारण दीदींची तेरावी अजून झालेली नाही. हिंदू धर्मानुसार आता घरात सुतक आहे. पण, मला बप्पी दांच्या घरी जायचे आहे.'

एक गायिका आणि एक संगीत निर्माता, दोघेही 10 दिवसांत निघून गेले
आशा भोसले म्हणाल्या, "मला बप्पींना भेटायचे होते. मी ड्रायव्हरलाही अनेकवेळा सांगितले की, चला बप्पी दांना भेटुया. पण तो म्हणाला की, या कोरोनाच्या काळात आपण जाऊ, पण त्यांना काही झाले तर तुमची बदनामी होईल. मग तुम्हाला ते आवडणार नाही. मी म्हणाले- मला कोरोनाची लागण झालेली नाही मग त्यांना माझ्यामुळे कशी होणार. कुणाला काही होवा अथवा न होवो पण सध्या आपण कुणाच्याही घरी जायला नको. जर काही घडले तर सगळे म्हणतील की आशाताई आली होती. असे बोलून त्याने मला समजावले आणि मी भेटायला जाऊ शकले नाही. आज मला कळले की ते कायमचे निघून गेले आणि आमची भेट झालीच नाही. ही खूप दुःख घटना आहे. ते खूप मनस्वी स्वभावाचे होते. जर कुणी काही बोलले तरी ते हसायचे. काही बोलत नसे. एक गायिका आणि एक संगीतकार, दोघेही दहा दिवसांत कायमचे आपल्यातून निघून गेले. दीदींना जाऊन आज दहा दिवस झाले आहेत. संगीत क्षेत्राला हा मोठा धक्का आाहे. याचा त्यांच्या चाहत्यांच्या मनावर खूप प्रभाव पडला आहे."

बप्पी दा यांच्यासोबत मी जवळपास 500 गाणी गायली आहेत
आशा भोसले म्हणाल्या, "बप्पी दा जेव्हा आले होते, त्यानंतर मी त्यांच्या पहिल्या चित्रपटात गाणे म्हटले होते. तो आमिर खानचे वडील ताहिर हुसैन यांचा चित्रपट होता. जेव्हा त्यांचे काम वाढले तेव्हा मी त्यांच्यासोबत सुमारे 500 गाणी गायली. ते अतिशय नम्र व्यक्ती होते. ते जास्त बोलत नसे. त्यांना दारू, सिगारेट, पान वगैरेचे व्यसनही नव्हते. ते खूप चांगले होते. त्यांच्या मुलाचा जेव्हा अन्नप्राशन होते, तेव्हा मी त्यांच्या घरी गेले होते. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला, घरी होणा-या कार्यक्रमांना मी जायचे. कोविडमुळेच त्यांच्या घरी मी जाऊ शकले नाही."

कोविड-19 नंतर मी त्यांना भेटणार होते
आशा भोसले पुढे म्हणाल्या, “त्यांची सर्व गाणी चांगली होती, गाणी खूप हिट झाली होती. 'जवानी जानेमन हसीन दिलरुबा…' या गाण्याचा शेवटा भाग जेव्हा रेकॉर्ड करायचा होता, तेव्हा मी त्यांना म्हणाले होते की, बप्पी दा तुमचा आवाज चांगला आहे. हा भाग तुम्ही गा. मी त्यांना असे करायला सांगितले, मग त्यांनी ते गायले. गाण्यानंतर जेव्हा मी बप्पी दांना सांगितले की, तुम्ही खूप छान गाता, पण तुमची हिंदी चांगली नाही, तेव्हा ते हसायला लागले होते. एक गाणे होते - 'डिस्को स्टेशन डिस्को...', जेव्हा मी या गाण्यात माझ्या आवाजात कंपने दिली, तेव्हा त्यांना ते खूप आवडले. ते लहान मुलांसारखे खळखळून हसायचे. मी कोविड-19 पूर्वी त्यांच्या घरी एक गाणे रेकॉर्ड केले होते. त्यानंतर मला त्यांना भेटायला जमले नाही."

रेकॉर्डिंग वेळी काहीही बोलत नसे
आशा ताईंनी पुढे सांगितले, "बप्पी दा यांच्या बद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे रेकॉर्डिंगवेळी ते कधीही त्रास देत नव्हते. मी त्यांच्यासाठी खूप गाणी गायली आहेत, पण त्यांनी कोणताही त्रास दिला नाही. वारंवार टोकणे, व्यत्यय आणणे वगैरे काही नसायचे. असे अनेक संगीत दिग्दर्शक करत असतात. ते खूप छान माणूस होते. त्यांची बायकोसुद्धा एका गायिकेची बहीण आहे, पण मी त्या गायिकेचे नाव विसरले आहे. त्यांची मुलगी रीमा लहरी ही खूप प्रेमळ आहे. तिने खूप छान घराची काळजी घेतली आहे. त्यांचा मुलगा बाप्पाही खूप छान आहे. ते इतक्या लवकर आम्हाला सोडून गेले याचे मला वाईट वाटत आहे. दीदींचेही कळले नाही. मला वाटले दीदी अजून तीन-चार वर्षे काढतील, पण तसे झाले नाही."

बातम्या आणखी आहेत...