आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुळे बॉलिवूडची चिंता वाढली:: रणबीर, मनोज, भन्साळी आणि आशिष विद्यार्थी पाठोपाठ आता तारा सुतारियाला कोरोनाची लागण, नुकतचे पूर्ण केले 'तडप'चे चित्रीकरण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री तारा सुतारियाची कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

या आठवड्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, मनोज बाजपेयी आणि आशिष विद्यार्थी यांच्या नंतर आता अभिनेत्री तारा सुतारियाची कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र ताराकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. ताराने नुकतेच तिच्या आगामी ‘तडप’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. मिलान लूथरिया दिग्दर्शित या चित्रपटात तिच्यासह अहान शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. 'तडप' 24 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

तारापूर्वी आशिष विद्यार्थी यांना झाला संसर्ग
ताराच्या आधी अभिनेते आशिष विद्यार्थी यांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त आले होते. त्यांना दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांनी स्वत: रुग्णालयातील एक
व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन आपल्या चाहत्यांना माहिती दिली. व्हिडिओमध्ये आशिष विद्यार्थी यांनी सांगितले की, त्यांची कोविड -19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांत जे लोक त्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांनीही टेस्ट करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मनोज बाजपेयी झाला कोरोनाचा संसर्ग
अभिनेता मनोज बाजपेयीलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. मनोजने स्वत:ला होम कॉरंटाइन केले आहे. मनोज बाजपेयी सध्या त्याच्या आगामी ‘Despatch’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. कानू बहल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कानू यांना कोरोनाची लागण झाल्यानंतरच मनोजला कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आले. दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांसाठी या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. तर मनोज बाजपेयीची प्रकृत्ती उत्तम असून त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याचे त्याच्या टीमकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मनोज वाजपेयीच्या ‘फॅमिली मॅन-2’ या वेब सीरिजच्या प्रदर्शानाची सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. फेब्रुवारीमध्ये ही वेब सीरिज रिलीज होणार होती. मात्र तांडवच्या वादामुळे ‘फॅमिली मॅन-2’ चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. तर लवकरच झी-5 या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या साइलेंस- कॅन यू हियर इट? या चित्रपटातून मनोज एका पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. 26 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

रणबीर कपूर आणि संजय लीला भन्साळी यांनाही कोरोनाची लागण

मनोज बाजपेयीपूर्वी रणबीर कपूर आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली होती. ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या डबिंगवेळी रणबीर कोरोनाच्या विळख्यात सापडला, तर संजय लीला भन्साळी त्यांच्या आगामी गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या रणबीर आणि भन्साळी दोघेही होम क्वारंटाइन आहेत. यापूर्वी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली होती.

फिल्मसिटीत होत नाहीये कोरोना प्रोटोकॉलचे पालन
बॉलिवूडमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्यामागचे कारण फिल्मसिटीत कोविड कोविड प्रोटोकॉल फॉलो केला जात नसल्याचे सांगितले जात आहे. मास्क न लावता लोकांना फिल्मसिटीमध्ये प्रवेश दिला जात आहे. फिल्मसिटीमध्ये लोक मास्क न घालता कॅन्टीन आणि इतरत्र फिरतानाही दिसतात. लोकांच्या दुर्लक्षामुळे मुंबईत कोरोनाचा संसर्ग पसरत आहे, तर बाहेरून येणा-या लोकांची तपासणीही इथे केली जात नाहीये.

बातम्या आणखी आहेत...