आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनसाइड फोटोज:लग्नानंतर यामी गौतमने शेअर केली मेहंदीची छायाचित्रे, लिहिले -'हे प्रिये, काळजी कशाला? जे आपल्यासाठी आहे ते आपल्यालाच मिळेल...'

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोटोमध्ये आदित्यसोबत दिसतेय यामी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर 4 जून रोजी लग्नाच्या गाठीत अडकले. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत यामीने चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.आता यामीने तिच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये यामी अतिशय सिंपल लूकमध्ये दिसतेय. तिने यलो रंगाचा सूट घातला असून त्यावर गोल्डन गोटा पट्टीचे वर्क आहे.

फोटोमध्ये आदित्यसोबत दिसतेय यामी
यामीने मेहंदीचे फोटो शेअर करत लिहिले, 'हे प्रिये, काळजी कशाला? जे आपल्यासाठी आहे ते आपल्यालाच मिळेल...' या फोटोंमध्ये यामी आदित्यकडे अतिशय प्रेमाने पाहताना दिसत आहे.

लग्नात केवळ मोजक्या पाहुण्यांची उपस्थिती
आदित्य आणि यामी यांचे लग्न खासगी पद्धतीने झाले. लग्नात अतिशय मोजके आणि जवळचे पाहुणे उपस्थित होते. आदित्यने दिग्दर्शित केलेल्या 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटात यामीने काम केले होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांचे प्रेम फुलत गेले. परंतु या दोघांनीही आपल्या रिलेशनबद्दल सोशल मीडियावर कुठेही वाच्यता केली नाही.

यामीचे फिल्मी करिअर
यामीचा जन्म 28 नोव्हेंबर 1988 रोजी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे झाला. तिने मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. फेअर अँड लवलीसाठी तिने पहिल्यांदा जाहिरात केली
होती. त्यानंतर ती चांद के पार चलो या टीव्ही मालिकेत झळकली. प्यान न होगा कम या मालिकेतही तिने काम केले होते. 2012 मध्ये 'विक्की डोनर'मधून यामी गौतमने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.
तिचा पहिलीच चित्रपट सुपरहिट ठरला होता. तर आदित्यने 2019 मध्ये उरी : द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटासाठी आदित्यला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा
राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

बातम्या आणखी आहेत...