आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर आता ग्रॅमी पुरस्कार 2022 मध्ये देखील दिवंगत भारतीय पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. 2022 ग्रॅमीज इन मेमोरिअम सेगमेंटमध्ये संगीतकार स्टीफन सोंधेम, टेलर हॉकिन्स आणि टॉम पार्कर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र लता मंगेशकर, दिलीप कुमार आणि बप्पी लाहिरी यांच्या नावांचा येथे उल्लेख झाला नाही. पूर्वी ऑस्कर सोहळ्यात देखील या दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यात आली नव्हती. यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
यापूर्वी, अकादमीने इन मेमोरिअम विभागात इरफान खान, भानू अथैया, सुशांत सिंग राजपूत आणि ऋषी कपूर यांचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यामुळे ऑस्कर आणि ग्रॅमी या दोन्ही पुरस्कारांच्या इन मेमोरिअम विभागात दिग्गज गायकांची नावे घेतली गेली नाही, त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.
सोशल मीडियावर चाहत्यांची नाराजी
सोशल मीडियावर एका चाहत्याने लिहिले, "आज संध्याकाळी इन मेमोरिअम सेगमेंटमध्ये तुम्ही प्रतिष्ठित आणि दिग्गज गायिका #LataMangeshkar, @mangeshkarlata यांना कसे विसरलात?"
आणखी एका चाहत्याने लिहिले, "#Grammys #LataMangeshkar मागील वर्षी निधन झालेल्या संगीतकारांचे स्मरण झाले. #लता मंगेशकर यांना न आठवून त्यांनी मोठी चूक केली आहे."
आणखी एका चाहत्याने लिहिले, "#GRAMMYs ने भारतीय इतिहासातील महान गायकांना श्रद्धांजली वाहिली नाही: #लता मंगेशकर आणि #बप्पी लाहिरी"
वयाच्या 13 व्या वर्षी केली होती करिअरला सुरुवात
लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी कोविडमुळे निधन झाले. 28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या लतादीदींनी 1942 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी आपल्या करिअरला सुरुवात केली. सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी हजारांहून अधिक हिंदी चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड केली. त्यांनी 36 हून अधिक प्रादेशिक आणि परदेशी भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली. 2001 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरविण्यात आले होते.
बप्पी लाहिरींनी शेवटचे 'बागी 3' कंपोज केले होते गाणे
गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे यावर्षी 15 फेब्रुवारी रोजी वयाच्या 69 व्या निधन झाले. त्यांना छातीत संसर्ग झाला होता. त्यांनी 'डिस्को डान्सर', 'हिम्मतवाला', 'शराबी', 'डान्स डान्स', 'सत्यमेव जयते', 'कमांडो' आणि 'आज के शहेनशाह' यांसारख्या चित्रपटांसाठी गाणी कंपोज केली होती. 2020 मध्ये आलेल्या 'बागी 3' चित्रपटासाठी बप्पी दांनी 'भंकस' हे गाणे तयार केले होते. हे त्यांचे शेवटचे गाणे ठरले
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.