आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग अपडेट:'पॅडमॅन'नंतर आता 'ओह माय गॉड 2'च्या चित्रीकरणासाठी पुन्हा एकदा MP कडे वळला अक्षय कुमार, उज्जैनमध्ये सप्टेंबरपासून सुरु होऊ शकते चित्रपटाची शूटिंग

अमित कर्ण14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'ओह माय गॉड 2' मध्ये अक्षय आणि पंकजसोबत दिसेल यामी गौतम

चित्रपटांचे निर्माते आता शूटिंगसाठी उत्तर प्रदेशऐवजी मध्य प्रदेशला प्राधान्य देताना दिसत आहेत. लॉकडाउनपूर्वी येथे 22 चित्रपट, वेब शोज आणि मालिकांचे चित्रीकरण सुरु होते. यूपीत केवळ अर्धा डझन प्रोजेक्टचे चित्रीकरण सुरु आहे. आता हळूहळू एमपीमधील विविध जिल्हे अनलॉक होत आहेत. त्यामुळे निर्माते पुन्हा एकदा तिथे चित्रपटांचे चित्रीकरण करण्याच्या विचारात आहेत. ताज्या वृत्तानुसार, अक्षय कुमार सप्टेंबरपासून मध्य प्रदेशात त्याच्या आगामी 'ओह माय गॉड 2' या चित्रपटाची शूटिंग सुरु करणार आहे. एमपी टुरिज्मच्या अधिका-यांनी सांगितल्यानुसार, उज्जैन येथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होऊ शकते.

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीचा चित्रपट 'ओह माय गॉड 2'मध्ये आता यामी गौतमचीही एंट्री झाली आहे. चित्रपटाशी संबंधित अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, मागील भागाची कथा या चित्रपटात नाही. यावेळी निर्माते एक वेगळी कथा सांगतील. हे कोर्टरुम नाटकही नाही आणि यावेळी अक्षय कुमारसुद्धा विष्णूच्या अवतारात दिसणार नाही. तो यावेळी दुस-या देवाच्या अवतारात दिसेल. शेवटचा भाग परेश रावल यांच्या दृष्टिकोनातून होता. यावेळी पंकज त्रिपाठी यांच्या दृष्टिकोनातून असेल.

सप्टेंबरपासून सुरु होईल शूटिंग
चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरपासून सुरु होईल. कारण अक्षयकडे पुढील दोन महिन्यांसाठी तारखा नाहीत. जर अक्षयच्या टीममधील लोकांचे म्हणणे मानले तर, अक्षय या दोन महिन्यात दोन चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करेल. सध्या त्याची प्राथमिकता 'राम सेतू' आहे. 20 जूनच्या सुमारास तो त्याचे चित्रीकरण सुरु करेल. त्याचा सेट फिल्मसिटीमध्ये आहे. त्याच्या शेजारीच 'रक्षाबंधन' चित्रपटाचा सेट आहे. दोन्ही चित्रपट दोन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करेल.

यामीचा रोमँटिक अँगल नसेल
सूत्रांच्या माहितीनुसार, यामीची या चित्रपटातील भूमिका खूप महत्त्वाची आहे. पण यात कोणताही रोमँटिक अँगल नाही. यामीच्या अगोदर या भूमिकेसाठी मृणाल ठाकूरच्या नावाची चर्चा होती. पण यामीच्या लग्नानंतर लगेच तिचे नाव समोर आले आहे. अद्याप निर्मात्यांकडून याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

'रक्षाबंधन'मध्ये भूमी पेडणेकरची एंट्री
सोमवारी अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन' या चित्रपटाशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भूमी पेडणेकरची एंट्री या चित्रपटात झाली आहे. निर्मात्यांनी यासाठी भूमीकडे संपर्क साधला होता आणि तिला तिची भूमिकादेखील आवडली आहे. तिच्या या चित्रपटात सामील होण्याच्या औपचारिकतेवर काम वेगाने सुरु आहे. जर सर्व काही नियोजनानुसार, झाले तर या चित्रपटाचे शूटिंग 21 जूनपासून सुरु होईल.

बातम्या आणखी आहेत...