आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरुखचा आगामी चित्रपट:'पठाण'नंतर राजकुमार हिराणींच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार शाहरुख खान, 'या' अभिनेत्रीच्या नावावर झाले शिक्कामोर्तब

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाच्या चित्रीकरणाला शाहरुख जूनपासून सुरुवात करणार आहे.

अभिनेता शाहरुख खान सध्या दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रिपोर्टनुसार शाहरुख या चित्रपटाचे शूटिंग संपवून दिग्दर्शक-निर्माते राजकुमार हिराणी यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.

वृत्तानुसार, शाहरुखने हिराणींच्या चित्रपटासाठी आपली संमतीही दिली आहे. सामाजिक विषयावर आधारित या चित्रपटाच्या चित्रीकरणाला शाहरुख जूनपासून सुरुवात करणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयारी सुरू झाली आहे. शूटिंगची जागा शोधण्यात हिराणींची टीम व्यस्त आहे. प्री-प्रॉडक्शनचे कामही सुरू झाले आहे. स्थलांतरितांच्या अडचणींवर चित्रपटाचे कथानक आधारित असेल.

शाहरुखसोबत झळकणार तापसी
या चित्रपटात शाहरुख खानसह अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तापसीला पहिल्यांदाच शाहरुखसोबत स्क्रिन स्पेस शेअर करण्याची संधी मिळाली आहे. हिराणींचा हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर शाहरुख दक्षिणचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटलीच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. शाहरुखने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 'पठाण'च्या शूटिंगला सुरुवात केली होती.

अलीकडेच 'पठाण'च्या सेटवर झाला होता राडा

अभिनेता शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाच्या सेटवर मागील आठवड्यात भांडण झाल्याचे वृत्त होते. त्यामुळे एक दिवस चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. एका सहाय्यक दिग्दर्शकाने 'पठाण'चा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या थोबाडीत मारल्याचे वृत्त होते. या घटनेनंतर चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्रा यांनी यशराज स्टुडिओची सुरक्षा कडक केली आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये शाहरुख खानचा हा फोटो यशराज स्टुडिओच्या बाहेर क्लिक करण्यात आला होता. हा त्याचा 'पठाण' चित्रपटातील लूक असल्याचे म्हटले जाते.
नोव्हेंबर 2020 मध्ये शाहरुख खानचा हा फोटो यशराज स्टुडिओच्या बाहेर क्लिक करण्यात आला होता. हा त्याचा 'पठाण' चित्रपटातील लूक असल्याचे म्हटले जाते.

'पठाण'च्या सेटवर नेमके काय झाले?
बुधवारी, मीडिया आणि सोशल मीडियामध्ये दिवसभर अशी बातमी समोर आली होती की, एका सहाय्यक दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक सिद्धार्थच्या कानशिलात लगावली होती. असे सांगितले जाते की, हा सहाय्यक सेटवर नो कॅमेरा, नो मोबाईलच्या नियमांचे उल्लंघन करत होता. सिद्धार्थने त्याला टोकल्यानंतरही त्याने त्याचे ऐकले नाही. उलट त्याने सिद्धार्थला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. रागात सिद्धार्थने त्याला चापट मारली तेव्हा त्यानेही सिद्धार्थवर हात उगारला.

सहाय्यक दिग्दर्शकाला नोकरीवरून काढून टाकले
सहाय्यक दिग्दर्शकाला नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाद्वारे शाहरुख तब्बल तीन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असून 'पठाण' हा चित्रपट यावर्षी दिवाळीत प्रदर्शित होऊ शकतो. यापूर्वी तो आनंद एल राय यांच्या 'झिरो' (2018) मध्ये दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...