आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लैंगिक छळ प्रकरण:पायल घोषच्या आरोपांनंतर अनुरागच्या समर्थनार्थ पुढे आला बॉलिवूड आणि मराठी अभिनेत्री, अमृता म्हणाली - आज मला तुझे आभार मानायचे आहे

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री अमृता सुभाष, राधिका आपटे आणि तापसी पन्नू यांनी अनुरागला पाठिंबा दिला आहे.

अभिनेत्री पायल घोषने बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला असून त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्री कंगना रनोटने पायलला पाठिंबा दिला असून अनुराग असे करु शकतो. त्याने आपल्या सर्वच जोडीदारांना फसवले आहे, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्री पुढे आल्या असून त्यांनी अनुरागला आपला पाठिंबा दिला आहे. अभिनेत्री अमृता सुभाष, राधिका आपटे आणि तापसी पन्नू यांनी अनुरागला पाठिंबा दिला आहे.

मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषने अनुरागसोबतचा एक फोटो शेअर करुन त्याचे आभार मानले आहेत. अमृताने लिहिले, तू अत्यंत प्रामाणिक, प्रेमळ आणि ख-या व्यक्तींपैकी एक आहे,. तू सेटवर मला नेहमीच आदराने वागवले आणि सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदर केला आहे. मी कधीच शब्दांत तुला हे सांगितले नाही. कारण मला कधीच त्याची गरज वाटली नाही. मात्र आज मला तुझे आभार मानायचे आहे. तू मला दिलेल्या आदरासाठी खूप धन्यवाद.'

अभिनेत्री राधिका आपटे हिनेदेखील इंस्टाग्रामवर अनुरागसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, 'अनुराग कश्यप तू माझ्या सर्वात जवळचा मित्र राहिलाय. तू मला प्रेरणी दिली आणि नेहमी मला साथ दिली. तू मला नेहमीच समान हक्क दिला. आपलं एकमेकांप्रती जे प्रेम, जो सन्मान आहे, तो वेगळा आहे. ज्या दिवसापासून मी तुला ओळखते, तेव्हापासून मला तुझ्यासोबत सुरक्षित जाववलं आहे. तू नेहमी माझा खरा मित्र राहिला आणि राहणार. खूप खूप प्रेम.'

राधिका आणि अमृतापूर्वी अभिनेत्री तापसी पन्नू हिनेदेखील सोशल मीडिया पोस्टद्वारे अनुरागला पाठिंबा दिला होता. ‘माझ्या मित्रा, मला माहित असलेल्यांपैकी तू सर्वांत मोठा स्त्रीवादी आहेस. सेटवर लवकरच भेटू. तू निर्माण करत असलेल्या विश्वात स्त्रिया किती सामर्थ्यशाली आणि महत्त्वपूर्ण आहेत हे त्यातून (चित्रपटातून) स्पष्ट होणार आहे’, असे तापसीने म्हटले आहे.

काय आहेत पायल घोषचे आरोप?

अनुरागने माझा लैंगिक छळ केला, तसंच अभद्र भाषेचाही वापर केला, असा आरोप पायल घोषने केला आहे. एका मुलाखतीत पायलने तिची आपबिती कथन केली.

तिने सांगितल्यानुसार, "मी अनुराग यांना भेटायला त्यांच्या यारी रोड इथल्या ऑफिसमध्ये गेली होती. ते दुसऱ्या कुणाशी तरी बोलत होते म्हणून मी परत आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि बोलावले. काही ग्लॅमरस घालू नको असे त्यांनी सांगितले. म्हणून मी सलवार कमीज घालून त्यांना भेटायला गेले. त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी जेवण बनवले, आमचे जेवण झाल्यानंतर त्यांनी माझी जेवणाची प्लेटही उचलली. त्यानंतर मी तिथून निघून आले. त्यांनी मला पुन्हा मेसेज करून बोलावले. मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता म्हणून मी त्यांना भेटायला नाही येऊ शकत असे सांगितले." यानंतर दोन-तीन दिवसांनी मी अनुराग यांना पुन्हा भेटले, यावेळी मी त्यांच्या घरी गेले होते, असे पायलने सांगितले.

पायल म्हणाली, "त्यांनी मला घरी बोलावले होते. ते स्मोकिंग करत होते, मी तिथे बसले होते. त्यानंतर अनुराग यांनी मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक ते माझ्यासमोर न्यूड झाले आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्यांना म्हटले मला कन्फर्टेबल वाटत नाहीये, यावर ते मी ज्या अभिनेत्रींसह काम केले आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे अनुराग मला म्हणाले. मी पुन्हा त्यांना सांगितले, मला अस्वस्थ वाटतंय. काही तरी करून मी तिथून कसाबसा पळ काढला. त्यानंतर मी त्यांना कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावले. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो", असे पायल म्हणाली.

बातम्या आणखी आहेत...