आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सक्लुझिव्ह:अक्षयसोबत ‘रामसेतू’ नंतर आता शाहिदसोबत व्यंगात्मक वेब शो बनवणार प्राइम व्हिडिओ

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज-डीकेच्या दिग्दर्शनात सुरू आहे काम...

ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमने नुकतीच अक्षय कुमार अभिनीत “रामसेतू’ चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली होती. यावरून अॅमेझॉन पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म ठरला आहे, जो चित्रपटाची निर्मिती करत आहे. आता याच क्षेत्रात अॅमेझॉन पुढे जात असल्याचे कळले आहे. ही कंपनी आता शाहिद कपूरसोबत ‘अश्वलिंगा’ नावाचा वेब शोदेखील बनवणार असल्याची चर्चा आहेे. हा एक व्यंगात्मक वेब शो असेल. याचे शूटिंग गोव्यात सुरू झाले आहे. लवकरच याविषयी अधिकृत माहिती सांगण्यात येणार असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

सिरीजमधून सांगणार ६०० वर्षांपूर्वीची कथा
शोची कथा काही प्रमाणात आयुष्मान खुराणा अभिनीत चित्रपट “विकी डोनर’ शी मिळती-जुळती आहे. मात्र ही कथा आजपासून ६०० वर्षापूर्वीची काळातील आहे. यात शाहिदचे पात्र मुल-बाळ नसलेल्या दाम्पत्याची मदत करते. याची कथा ‘तुंबाड’ फेम डायरेक्टर राही अनिल बर्वेने लिहिली आहे. आता ते दिग्दर्शक जोडी राज अँड डीकेसोबत मिळून दिग्दर्शन करणार आहेत. सिरीजचे सर्वात महत्त्वाचे भाग त्यांनी स्वत:च दिग्दर्शित केले आहेत. विशेष ही सिरीज आधी पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि कुणाल खेमूसोबत बनवले जाणार होती, मात्र आता ती शाहिद कपूरसेाबत बनवली जाणार आहे.

शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटाची चर्चा
याशिवाय “कबीर सिंह’चे निर्माते अश्विन वर्दे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रानुसार, “अश्विन वर्दे दक्षिणेच्या लायका प्रॉडक्शन्ससोबत या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये दमदार एंट्री करणार आहेत. याविषयी अश्विनने शाहिद कपूरसोबत संपर्क केला आहे आणि त्याला या भूमिकेची विचारणा केली आहे. शाहिदलाही त्यांचा हा विचार आवडला. दोघेही यावर चर्चा करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...