आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूड:कोरोनाची लागण झाल्याने आलिया भट्ट होम क्वारंटाइन, आठवड्याभरापूर्वीच बॉयफ्रेंड रणबीर झाला कोरोनामुक्त

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आलिया म्हणाली- 'मी सर्व सेफ्टी प्रोटोकॉल पाळत आहे'

अभिनेता रणभीर कपूर आठवड्याभरापूर्वीच कोरोनामुक्त झाला. त्यानंतर आता त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री आलिया भट्ट हिला कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी 28 वर्षीय आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे,' असे आलियाने सांगितले आहे.

'मी सर्व सेफ्टी प्रोटोकॉल पाळत आहे'

आलियाने पुढे लिहिले आहे, 'मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. तुम्ही देखील तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा,’ या आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे. बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि आगामी 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आलियाने 11 मार्च रोजी कोविड चाचणी करुन घेतली होती. मात्र त्यावेळी तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तरीदेखील तिने त्याकाळात स्वतःला आयसोलेट केले होते.

आठवडाभरापूर्वीच रणबीरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता
आठवडाभरापूर्वी रणबीर कपूरच्या कोविड 19 टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. रणबीरचे काका रणधीर कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याची टेस्ट निगेटिव्ह आली असून आता तो पूर्णपणे ठीक आहे.

'गंगूबाई काठियावाडी'च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार होती

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे आलिया भट्ट लवकरच 'गंगूबाई काठियावाडी'चे रखडलेले शूटिंग पुन्हा सुरू करणार होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. आलिया भन्साळींची सेटवर परत येण्याची वाट पहात होती. मात्र आता आलिया स्वतः कोरोनाग्रस्त झाल्याने चित्रीकरण आणखी काही दिवसांसाठी थांबवण्यात आले आहे. तिचा रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट जवळजवळ पूर्ण झाला आहे. याशिवाय 'आरआरआर' या चित्रपटाद्वारे आलिया दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार असून यात ती महत्त्वाची भूमिका वठवणार आहे.

आलिया आता निर्मातीदेखील झाली आहे. अलीकडेच स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले असून 'इटरनल सनशाईन' हे त्याचे नाव आहे. या बॅनरखाली ती आपला पहिला चित्रपट 'डार्लिंग्ज' घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसोबतच आलिया यात भूमिकादेखील वठवणार आहे. आई मुलीच्या नात्यावर आधारित या चित्रपटात शेफाली शाह आलियाच्या आईची भूमिका साकारणार आहे. तर 'गल्ली बॉय' फेम विजय वर्मा आलियाच्या प्रियकरच्या भूमिकेत झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...