आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • After Ranbir Kapoor And Sanjay Leela Bhansali Get Infected Alia Bhatt Tests Negative For Covid 19, But Has Still Isolated Herself At Home

बॉलिवूडमध्ये कोरोना:रणबीर-भन्साळींना कोरोनाची लागण झाल्यावर आलिया भट्टची झाली कोविड टेस्ट, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरदेखील अभिनेत्रीने केले स्वतःला आयसोलेट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आलियाची दररोज कोविड चाचणी असते.

अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघेही कोविड पॉझिटिव्ह आल्ायनंतर त्यांच्यासोबत काम कऱणारी अभिनेत्री आलिया भट्ट हिनेदेखील आपली चाचणी करुन घेतली. दिलासादायक बाब म्हणजे, आलियाची कोविड 19 ची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आलियाची दररोज कोविड चाचणी असते. मंगळवारीदेखील तिची कोविड टेस्ट झाली होती, ज्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र तरीदेखील आलियाने स्वतःला अलगीकरणात ठेवले आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीर आणि संजय लीला भन्साळी यांना संसर्ग झाला आहे. दोघांनाही कोरोनाची लागण झाल्यानंतर भन्साळींच्या 'गंगूबाई काठियावाडी' आणि रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे.

संजय लीला भन्साळींच्या आईचा रिपोर्ट आला निगेटिव्ह

वृत्तानुसार, टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. भन्साळी यांच्या मातोश्री लीला भन्साळी यांचीही चाचणी करण्यात आली. मात्र त्या कोरोना निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तरी देखील त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे.

नीतू कपूर यांनी दिली होती रणबीर पॉझिटिव्ह असल्याची माहिती
मंगळवारी रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रणबीरला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. त्यांनी लिहिले होते, रणबीरला कोविड 19 ची लागण झाली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती सुधारत आहे. तो घरात क्वारंटाइन असून योग्य ती काळजी घेतोय. सोबतच नीतू यांनी सर्व चाहत्यांचे त्यांच्या प्रेमाबद्दल आभारदेखील व्यक्त केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...