आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • After Rhea Chakraborty Police Questioned Sushant Singh Rajput Ex Publicist Rohini Iyer For 9 Hours Meanwhile Ajaz Khan Demands CBI Inquiry

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांतची जवळची मैत्रीण रोहिणी अय्यरची पोलिसांकडून 9 तास चौकशी, इजाज खानची सीबीआय चौकशीची मागणी 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोहिणी ही सुशांतची जुनी मैत्रीण होती.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बर्‍याच जणांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, वांद्रे पोलिसांनी सुशांतची मैत्रीण रोहिणी अय्यर हिला चौकशीसाठी बोलावले. सोमवारी 22 जून रोजी रोहिणीची सुमारे 9 तास चौकशी केली गेली आणि तिचा जबाब नोंदवला गेला. 

रोहिणी ही सुशांतची जुनी मैत्रीण होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती सुशांतच्या संपर्कात होती. इतर व्यक्तींच्या जबाबात रोहिणीचा उल्लेख झाल्याने आता तिचाही जबाब नोंदवला गेला आहे. 

मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांचे जबाब घेतले आहेत. यात त्याची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीपासून बहीण, वडील, घरातील नोकर यांचा समावेश आहे. सुशांतची कायदेशीर सल्लागार अ‍ॅडव्होकेट प्रियांका खिमानी हिचाही जबाब वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. पोलिसांनी सुशांतच्या चार्टर्ड अकाऊंटलाही चौकशीसाठी बोलावले.  

  • सुशांतच्या डॉक्टरांचीही होऊ शकते चौकशी 

रिपोर्ट्सनुसार, सुशांत गेल्या 6 महिन्यांपासून नैराश्यावर उपचार घेत होता. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मानसोपचार तज्ज्ञ केरसी चावडा यांनी सांगितले होते की, ब्रेकअपनंतरही सुशांत अंकिताला विसरला नव्हता. केरसी चावडा यांनी अद्याप पोलिसांकडे जबाब रेकॉर्ड केलेला नाही. मुंबई पोलिस लवकरच त्यांनादेखील चौकशी बोलावू शकतात, असे वृत्त आहे.  

  • एजाज खानने केली सीबीआय चौकशीची मागणी 

अनेकदा वादात सापडलेला अभिनेता एजाज खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने लोकांना आवाहन केले की, 26 जून रोजी सुशांतची तेरावी आहे, त्यादिवशी प्रत्येकाने एक मेणबत्ती लावून सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करणारा एक व्हिडीओ पोस्ट करावा. जेणेकरून सुशांतच्या मृत्यूचे वास्तव समोर येऊ शकेल.  

बातम्या आणखी आहेत...