आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रश्मिका मंदानाने स्टेजवर केला धमाकेदार डान्स:श्रीवल्लीचा डान्स पाहून चाहते म्हणाले- दृष्ट न लागो

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रश्मिका मंदाना म्हणजेच पुष्पाची श्रीवल्ली सध्या तिच्या 'गुडबाय' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये रश्मिकाने गुलाबी पँटसह क्रॉप टॉप घातलेला असून या ड्रेसमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.

रश्मिकाची ही स्टाईल पाहून चाहते तिची जोरदार प्रशंसा करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'क्या बात है नजर ना लगे क्यूटनेट को'. तर त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने 'बॉलिवूडचा प्रभाव दिसू लागला आहे' असे लिहिले. रश्मिका मंदानाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबाय चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. व्हिडिओ पाहा...

बातम्या आणखी आहेत...