आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जय भीम' वाद:वन्नियार संगमने पाठवली होती कायदेशीर नोटीस, सूर्याच्या समर्थनार्थ ट्विटरवर ट्रेंड झाले #WeStandWithSuriya

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सूर्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर #WeStandWithSuriya ट्रेंड करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

वन्नियार समाजाने कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर अभिनेता सूर्याच्या समर्थनार्थ चाहते पुढे आले असून #WeStandWithSuriya हा हॅटटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. वन्नियार संगमने जय भीम वादावर सूर्या, ज्योतिका, टीजे ज्ञानवेल आणि अमेझॉन प्राइमला कायदेशीर नोटीस पाठवली. त्यानंतर सूर्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर #WeStandWithSuriya ट्रेंड करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
वन्नियार समाजाच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला कलंक लावणारी बदनामीकारक दृश्य जाणीवपूर्वक चित्रपटात टाकण्यात आली असल्याचा आरोप करत वन्नियार संगमच्या प्रदेशाध्यक्षांनी सूर्या, ज्योतिका, दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल आणि अमेझॉन प्राइमला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यात एका दृश्याचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामध्ये वन्नियार समुदायाचे चिन्ह 'अग्निकुंडम' दाखवण्यात आले आहे.

पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये वन्नियार समाजाच्या प्रदेशाध्यक्षांनी चित्रपटातून बदनामी करणारी सर्व दृश्य काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसेच 'अग्निकुंडम' चिन्हाचा चित्रपटात जाणीवपूर्वक समावेश करण्यात आल्याचा दावाही नोटीसमध्ये करण्यात आला आहे. नोटीसमध्ये चित्रपटातील वादग्रस्त दृश्य हटवण्याच्या मागणीसोबतच 7 दिवसांत 5 कोटींची भरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

IMDB रेटिंगच्या टॉप 250 मध्ये सामील झाला चित्रपट
सूर्याच्या चाहत्यांसाठी आणि तामिळ सिनेमाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. जय भीम आणि सोरारई पोटरु या दोन्ही चित्रपटांनी IMDB च्या टॉप-रेटेड 250 चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे. या सतत बदलणाऱ्या यादीत केवळ आठ भारतीय चित्रपटांना स्थान मिळू शकले आहे, त्यापैकी तीन आमिर खान स्टारर आहेत. जय भीमला 120 वा रँक मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...