आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीसाठी कायम तत्पर:स्थलांतरीत मजुरांना घरी पोहोचवणा-या सोनू सूदच्या मनाचा मोठेपणा, केरळमध्ये अडकलेल्या 177 मुलांना केली अशी मदत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनू सूदने अलिकडेच केरळमध्ये अडकलेल्या 177 मुलींना विमानाने त्यांच्या घरी पोहोचविल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात अभिनेता सोनू सूद गरजूंसाठी देवदूत ठरला आहे. स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पाठवण्यासाठी त्याने बसेसची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत शेकडो मजुर त्यांच्या घरी परतले आहेत. आता त्याने केरळमध्ये अडकलेल्या 177 मुलींना त्यांच्या घरी सुखरुपरित्या पोहोचवले आहे.

केरळमधील एर्नाकुलम येथील एका फॅक्ट्रीमध्ये काम करणाऱ्या जवळपास 177 मुली लॉकडाउनमुळे अडकल्या होत्या. या मुलींची माहिती भूवनेश्वरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने सोनूला दिली. त्यानंतर सोनूने या मुलींना तेथून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. त्याने सरकारकडून भुवनेश्वर आणि कोच्ची विमानतळ काही वेळासाठी सुरु करण्याची परवानगी घेतली. त्यानंतर सोनूने बंगळुरुवरुन एक स्पेशल एअरक्राफ्ट मागवून या मुलींना भुवनेश्वरला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले. 

मदतीसाठी सोनू सूदने दिला आहे टोल फ्री नंबर

टोल फ्री क्रमांकाबाबत सोनूने एका मुलाखतीत सांगितले, ‘मला दररोज हजारो कॉल येत होते. माझे कुटुंब आणि मित्र सर्व डेटा गोळा करत होते, त्यात बरेच लोक आमच्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याचे आम्हाला कळले. म्हणून आम्ही कॉल सेंटर उघडण्याचा विचार केला, हा एक टोल फ्री क्रमांक आहे. आमच्याकडे एक टीम आहे, जी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.’

बातम्या आणखी आहेत...