आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवा उपक्रम:आता सोनू सूद नोकरीही देणार, यासाठी लाँच केले 'प्रवासी रोजगार अॅप', लॉकडाऊनमध्ये हजारो प्रवाशांना घरी पाठवून कमावले नाव

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाव्हायरसमुळे देशात लॉकडाऊन लागले आणि यानंतर सोनू सूद सर्वांचा आवडता झाला. हजारो प्रवासी घरी पाठवल्यानंतर सोनूने अजून एक पुढाकार घेतला आहे. आता तो परप्रांतीयांना नोकर्‍या मिळवून देण्यासही मदत करणार आहे. यासाठी सोनूने 'प्रवासी रोजगार' नावाचे एक अॅप सुरू केले आहे. जे स्थलांतरितांना नोकरी शोधण्यासाठी माहिती आणि योग्य लिंक प्रदान करेल. सोनूने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती शेअर केली आहे.

500 कंपन्यांसोबत टायअप, 7 शहरांमध्ये उपलब्ध 
देशाच्या विविध भागांमध्ये प्रवासी श्रमिकांसाठी रोजगारची योग्य संधी शोधण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्मवर मॅन्युफॅक्चरिंग, गारमेंट्स, हेल्थ सर्विस, इंजीनियरिंग, बीपीओ, सिक्योरिटी, ऑटोमोबाइल, ई-कॉमर्स आणि रसद क्षेत्रासंबंधीत 500 पेक्षा अधिक प्रतिष्टित कंपन्यांमधील नोकरीच्या संधीविषयी माहिती मिळणार आहे. या सेवेची सुरुवात 23 जुलैपासून होत आहे. येथे चोवीस तार हेल्पलाइनसह दिल्ली, मुंबई, बंगलुरू, हैदराबाद, कोयम्बटूर, अहमदाबाद आणइ तिरुअनंतपुरमसह सात शहरांमध्ये मायग्रेशन सहाय्यता केंद्र स्थापित करण्यात आले आहेत.

लॉकडाऊनदरम्यान झाली प्लानिंग 
सोनू सूद म्हणाला - 'गेल्या काही महिन्यामध्ये हा उपक्रम सुरू करण्याविषयी खूप विचार केला आणि नंतर प्लान तयार केला. देशाच्या टॉप ऑर्गनाइजेशनसोबत डिस्कशन केले आहे, जे दारिद्र रेषेखालील तरुणांना आणि गरीबांना नोकरी देण्यास तयार आहे. ते एजीओ, सोशल ऑर्गनाइजेशन, गवर्नमेंट ऑफिशियल्सचे स्टार्टअप आहेत. ते म्हणतात, देशात 6 कोटींपेक्षा जास्त, परप्रांतिय प्रवासी श्रमिक आहेत. त्यामधील 3 कोटी मजूर आहेत. लवकरच या अ्रपवर जवळपास 1 कोटी लोक असतील'