आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलीकडेच अभिनेत्री शगुफ्ता अलीने ती आर्थिक संकटात असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर इंडस्ट्रीतील बरेच लोक तिच्या मदतीसाठी पुढे आले. आता अनेक चित्रपटांमध्ये झळकलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज यांनी आपली आपबिती कथन करताना अनेक वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे सांगितले आहे. सविता बजाज यांना काही महिन्यांपूर्वी कोविडची लागण झाली होती, त्यामुळे त्यांना सुमारे 22 दिवस रुग्णालयात राहावा लागले होते. आता श्वसनाच्या त्रासामुळे पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारांमुळे आता त्यांच्याजवळचे सर्व पैसे संपले आहेत.
अलीकडेच आपली आपबिती सांगताना सविता बजाज यांनी ई-टाईम्सला सांगितले, 'मला श्वसनाचा आजार सुरू झालाय, या परिस्थितीत मी कसं जगेल मलाच माहित नाही. प्रकृती ठीक नसल्याने मी आता कामदेखील करु शकत नाही. दुर्दैवाने माझी काळजी घेणारे माझ्याजवळ कुणी नाही.'
पुढे त्या म्हणाल्या, '25 वर्षांपूर्वी मी दिल्लीमध्ये असलेल्या माझ्या घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यावेळी माझ्या कुटुंबीयांनी मला घरी ठेवण्यास नकार दिला होता. मी आतापर्यंत खूप कमावले. अनेकांची मदत केली. पण आता माझी मदत करण्यासाठी कुणी नाही,' त्या म्हणाल्या.
सविता बजाज यांनी पुढे सांगितले की, अनेक वर्षे इंडस्ट्रीत काम केल्यानंतरही मुंबईत मी स्वतःचे घर खरेदी करु शकली नाही. सविता सध्या मालाड येथे एका वन रूम किचनच्या घरात राहतात. या घरासाठी त्यांना महिन्याला सात हजार रुपये घरभाडे द्यावे लागते.
79 वर्षीय सविता बजाज यांनी आपल्या कारकिर्दीत 50 चित्रपटांमध्ये काम केले. 'नदिया के पार', ‘निशांत’, ‘नजराना’, ‘बेटा हो तो ऐसा’ हे त्यांचे निवडक चित्रपट आहेत. याशिवाय त्यांनी ‘नुक्कड’, ‘मायका’ आणि ‘कवच’ सारख्या टीव्ही मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे.
अॅक्टर्स असोसिएशनने केली होती मदत
सविता बजाज यांनी सांगितल्यानुसार, रायटर्स एसोसिएशनने 2016 मध्ये त्यांना एक लाख रुपयांची आणि (CINTAA) सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने 50 हजार रुपयांची मदत केली होती. त्यावेळी त्यांचा एक अपघात झाला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.