आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इंडस्ट्रीतील वाद:शेखर गुप्ता यांच्यानंतर आता अदनान सामीने केली अवॉर्ड शोची पोलखोल - 'फ्रीमध्ये परफॉर्म केल्यास दिला जातो अवॉर्ड'

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी पुरस्कार विकत घेण्यास नकार दिल्याचे अदनाने सांगितले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर एकीकडे घराणेशाहीवरुन वादंग पेटले आहे, तर आता दुसरीकडे अवॉर्ड फंक्शन, त्यात दिले जाणारे पुरस्कार यावरुनही पोलखोल होत आहे. वरिष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी अलीकडेच एक व्हिडिओ शेअर करुन करण जोहरसह काही फिल्ममेकर्स अवॉर्ड फंक्शन्समध्ये हस्तक्षेप करत असल्याचे उघड केले होते. शेखर गुप्ता यांच्यानंतर आता गायक अदनान सामीनेदेखील पुरस्कार सोहळ्याचे मोठे रहस्य उघड केले आहे. आपला अनुभव सांगताना अदनान म्हणाला की, फ्रीमध्ये सादरीकरण केल्यास मला अवॉर्ड दिला जाणार होता. मात्र मी पुरस्कार विकत घेण्यास नकार दिल्याचे अदनाने सांगितले.

दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या टि्वटला उत्तर देताना अदनानने हा खुलासा केला. शेखर कपूर यांनी पत्रकार शेखर गुप्ता यांचा लेख शेअर करताना पुरस्काराला कौतुकाच्या बदल्यात तडजोड म्हटले आहे. शेखर कपूर यांनी लिहिले की, 'बॉलिवूडमधील पुरस्कार सोहळे हे तुमचे कौशल्य पाहून दिले जात नाहीत. जर मी तुला एक पुरस्कार दिला तर तू माझ्यासाठी स्टेजवर डान्स करशील का?’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

शेखर कपूर यांच्या या ट्विटला उत्तर देत अदनान सामीने ट्विट केले. ‘खरे आहे हे. मला देखील असाच एक अनुभव आला होता. जेव्हा त्यांनी मला फ्रीमध्ये परफॉर्म करण्यासाठी सांगितले होते आणि त्यासाठी ते मला पुरस्कार देखील देणार होते. मी त्यांना तेथून जाण्यास सांगितले. मी एखादा पुरस्कार कधीच विकत घेणार नाही. एक पुरस्कार माझ्यासाठी माझा सन्मान आणि स्वाभिमान आहे’ अशा आशयाचे ट्विट अदनान सामीने केले आहे.

  • शेखर गुप्ता यांनी करण जोहरवर लावले आरोप

शेखर गुप्ता हे इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे प्रमुख होते. त्यावेळी हा समूह स्क्रीन अवॉर्ड्स नावाचे लोकप्रिय अवॉर्ड शोचे आयोजन करत असे. 2011 मध्ये या अशाच एका अवॉर्ड शोमध्ये शाहरुख खानच्या 'माय नेम इज खान' चित्रपटाला नामांकन देण्यात आले नव्हते. यामुळे करण आणि त्याच्या टीम सदस्यांना इतका राग आला की, त्यांनी शेखर गुप्ता यांना अनेक फोन केले. शाहरुख आणि करण त्या शोचे सादरीकरण करणारे होते, अशा परिस्थितीत अत्यंत गंभीर वातावरण निर्माण झाले होते. नंतर प्रकरण मिटविण्यासाठी शाहरुख खानला पॉप्युलर चॉईस अवॉर्ड देण्यात आला. करणच्या टीमने म्हणणे होते की, अमोल पालेकर या कार्यक्रमासाठी ज्युरी सदस्य होते, म्हणून वैयक्तिक कारणास्तव शाहरुखला पुरस्कार देण्यात आला नाही.