आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये खळबळ:सोनाक्षी, साकीब आणि आयुषनंतर आता नेहा कक्कडने केली सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याची घोषणा, नंतर डिलीट केली पोस्ट 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या चित्रपट आणि संगीत क्षेत्रात घराणेशाहीवरुन वाद पेटला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. इंडस्ट्रीत घराणेशाही आणि कंपूबाजीवरुन प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे. या मोर्चात आता गायकदेखील सहभागी झाले आहेत. अलीकडेच घराणेशाही आणि गटबाजीवर प्रश्न उपस्थित झाल्याने सोनाक्षी सिन्हा, साकिब सलीम आणि आयुष शर्मासह अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरला अलविदा केले, तर आलिया भट, करण जोहर, सोनम कपूर, करीना कपूर, अनन्या पांडे, सुहाना खान यांनी त्यांच्या इंस्टाग्रामचे कमेंट सेक्शन लॉक केले. आता लोकप्रिय गायिका नेहा कक्कड हिनेदेखील सोशल मीडिया अकाऊंट सोडण्याची घोषणा केली पण त्यानंतर लगेच तिने ही पोस्ट डिलीटदेखील केली. 

रविवारी नेहा कक्कडने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन सोशल मीडियावरून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली. नेहाने एक भावनिक पोस्ट शेअर करताना लिहिले की, 'मी पुन्हा झोपी जात आहे. एक चांगले जग तयार झाल्यानंतर कृपया मला उठवा. असे जग जिथे स्वातंत्र्य, प्रेम, आदर, काळजी, मजा, स्विकार करणारे आणि चांगले लोक आहेत. द्वेष, मत्सर, घराणेशाही, निर्णय, बढाईखोर लोक, हिटलर, खून, आत्महत्या आणि वाईट लोक नाहीत. शुभ रात्री, झोपायला जात आहे काळजी करू नका, मी मरणार नाही, फक्त काही दिवस दूर जात आहे', अशा आशयाची पोस्ट तिने टाकली होती. पण काही तासांनी तिने ही पोस्ट डिलीट केली आणि ती आपल्या स्टोरी सेक्शनमध्ये पोस्ट केली. 
 

  • सोनू निगमने भूषण कुमारला म्हटले म्युझिक इंडस्ट्रीचा माफिया

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत घराणेशाहीवरुन वाद निर्माण झाला आहे.  अलीकडेच सोनू निगमने केवळ चित्रपटसृष्टीत नव्हे तर म्युझिक इंडस्ट्रीतही काही लोकांची मक्तेदारी असल्याचे म्हटले आहे. सोनूने टी-सीरिजचे मालक भूषण कुमारच्या नावाचा उल्लेख करत नव्या कलाकारांचे शोषण केले जात असल्याचे म्हटले आहे. यानंतर अदनान समी आणि अलिशा चिनॉय यांनीही सोनूला पाठिंबा दर्शवत आपले मत मांडले. 

बातम्या आणखी आहेत...