आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजून एक आत्महत्या:सुशांत सिंह राजपूतनंतर 16 वर्षीय टिकटॉकर सिया कक्कडने उचलले आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.

गेल्या काही महिन्यांत चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करणा-या कलाकारांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अलीकडेच अभिनेता सुशांत सिंह राजपूतने नैराश्येत येऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. त्याच्या निधनाच्या दुःखातून सावरत असतानाच अजून एका कलाकाराने आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवले आहे. 16 वर्षीय टिक टॉक स्टार सिया कक्कडने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. सियाचा मॅनेजर अर्जुन सरीन यांच्या माहितीनुसार, तिच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी एका व्हिडिओ अल्बमच्या बाबतीत त्यांचे तिच्याशी बोलणे झाले होते. त्यावेळी ती असे काही पाऊल उचलेल याची तिळमात्र शंका आली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

  • विरल यांनी शेअर केली बातमी

पापाराजी विरल भयानी यांनी सियाच्या निधनाची बातमी शेअर केली. सियाने आत्महत्या करण्यापूर्वी संध्याकाळी 4-5 वाजताच्या सुमारास तिचा लेटेस्ट व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. या व्हिडिओत ती 'बोहेमिया के शराबी तेरी ओर' या गाण्यावर डान्स करताना दिसली होती. सियाने हा व्हिडिओ पाच दिवसांपूर्वी बनवला होता. व्हिडिओ शेअर करुन उशीरा रात्री तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. तिच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. 

बातम्या आणखी आहेत...