आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडमध्ये वाद:सुशांतच्या मृत्यूनंतर साहिल खानने सलमान खानवर डागली तोफ, म्हणाला- 'मला ब-याच चित्रपटांतून काढून टाकले होते'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साहिल केवळ सात सिनेमांतच झळकला.

2001 मध्ये आलेल्या 'स्टाईल' चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. अभिनेता साहिल खानने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. पहिल्या चित्रपटातून त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली पण तो नंतर फार चित्रपटांमध्ये दिसला नाही. पहिल्या चित्रपटानंतरच त्याने शाहरुख आणि सलमानसोबत प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान पटकावले होते. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर आता इंडस्ट्रीतील बर्‍याच लोकांवर गटबाजी केल्याचा आणि घराणेशाहीचा आरोप होत आहे, त्यातच साहिलनेदेखील सुपरस्टार सलमान खानवर निशाणा साधला आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर साहिलने सलमान खानवर निशाणा साधतांना लिहिले की, 'पहिलाच चित्रपट स्टाईलनंतर भारतातील आघाडीच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर दोन सुपरस्टारसोबत झळकण्याची संधी मिळणे हे फार कमी लोकांच्या आयुष्यात घडतं असतं. पण त्या दोन सुपरस्टारपैकी एकाला खूप वाईट वाटलं. तेव्हा तर मी नवीन होतो, त्याचा चाहता होतो', असे साहिल म्हणाला. 

BOHUT KAM LOGON KE SAATH ZINDAGI MAIN AESA HOTA HAI KE APNI 1st FILM 🍿 #STYLE ❤️ KE BAD INDIA KE SABSE TOP FILM MAGAZINE KE COVER PAR, DO INDIA KE SAB SE BADE SUPER STAR KE SAATH HO.... MAGAR UNME SE EK SUPER STAR KO BOHUT BURA LAGA 🤣🤣 JAB KE MAIN TO NAYA THA, UNKA FAN THA, KAMZOR THA 😂 PHIR BHI WOH MUJHE KAI BAAR SIDE ROLE KE LIYE BULATE RAHE, TV SHOW KE LIYE BHI BULATE RAHE - AUR PHIR KAI FILMS SE MUJHE NIKALWA DIYA 😜 NAAM BADE AUR DARSHAN CHOTE 😂 GUESS WHO ??? I DONT GIVE A FUCK TODAY FOR HIM COZ @sushantsinghrajput NE UNKA SUCHHA ASLI CHEHRA DIKHA DIYA. DUNIYA KE WOH LOG NEW TALENTS SE KITNA DARTE HAI - 20 SAAL MAIN JOHN ABRAHAM KE ILAWA KOI NAHI AYA INDUSTRY MAIN BADA STAR COZ KOI ANE HI NAHI DETA; ONLY STAR SON KO HI KAAM MILTA HAI - THINK ABOUT IT - RIP💔💔🙏🏽 @sushantsinghrajput . . #IfYouDontKnowNowYouKnow #SahilKhan #Hunk #hunkwater #bollywood #history #OneLife #Mumbai #FitnessIC⭕️N #KaamKaroNaamKaro #OneLifeBaby

A post shared by India’s Fitness & Youth IC⭕️N (@sahilkhan) on Jun 17, 2020 at 6:33am PDT

पुढे सलमानच्या नावाचा उल्लेख न करता साहिलने लिहिले की, 'त्यानंतर तो मला बर्‍याचदा साइड रोलसाठी बोलवत राहिला, टीव्ही शोसाठीही कॉल केला. आणि मग मला बर्‍याच चित्रपटातून काढून टाकले. नाव मोठे आहे आणि दर्शन खोटे. विचार करा कोण असेल. मला काही फरक पडत नाही कारण सुशांतसिंग राजपूतने त्याचा खरा चेहरा दाखवला आहे. जगातील हे लोक नवीन प्रतिभेला किती घाबरतात. 20 वर्षांमध्ये जॉन अब्राहम सोडून इतर कोणीही इंडस्ट्रीमध्ये मोठा स्टार म्हणून आला नाही. कोणी येऊच देत नाही. केवळ स्टार किड्सनाच काम मिळते. त्याबद्दल विचार करा. तुझ्या आत्म्याला शांती लाभो, सुशांत', असे साहिलने लिहिले आहे.  

सलमान खानवर गटबाजी केल्याचा आरोप 

सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. बर्‍याच निर्मात्यांवर बाहेरील लोकांना काम न दिल्याचा आरोपही केला जात आहे. दरम्यान, दबंग दिग्दर्शक अभिनव   कश्यपनेही सलमानवर कॅम्प चालवल्याचा आरोप केला आहे. आता साहिलची ही पोस्टदेखील सलमानकडे इशारा करत आहे. 2001 मध्ये बॉलिवूडमध्ये एंट्री घेतल्यानंतर साहिल केवळ सात सिनेमांतच झळकला.  

0