आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वाद:तापसी पन्नूनंतर समीर सोनीने कंगना रनोटवर व्यक्त केला संताप, म्हणाला - ती वैयक्तिक अजेंडा सेट करण्यासाठी सुशांतच्या मृत्यूचा वापर करतेय 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना रनोटने एका मुलाखतीत सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक बड्या व्यक्तींना लक्ष्य केले होते.
  • स्वत:च्या स्वार्थासाठी मी एखाद्याच्या मृत्यूचा फायदा उचलू शकत नाही, असे म्हणत तापसी पन्नूने कंगनावर टीका केली होती.

शनिवारी (18 जुलै) एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री कंगना रनोटने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सुशांतच्या आत्महत्येसाठी तिने काही मोठ्या व्यक्तींना जबाबदार धरले. मात्र, तिचे हे रोखठोक मत बॉलिवूड सेलिब्रिटींना पसंत पडलेले दिसत नाही. रविवारी तापसी पन्नूने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. आता अभिनेता समीर सोनीनेही तिच्यावर निशाणा साधला आहे.

  • सुशांतच्या मृत्यूमुळे कंगना वैयक्तिक अजेंडा सेट करीत आहे: समीर

समीरच्या म्हणण्यानुसार, कंगना सुशांतच्या मृत्यूचा उपयोग वैयक्तिक अजेंडा सेट करण्यासाठी करत आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले- मी आधीच म्हटले आहे की सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू ही एक मोठी शोकांतिका आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पण मी कंगनासह अशा लोकांच्याही विरोधात आहे जे वैयक्तिक अजेंड्यासाठी त्यांच्या मृत्यूचा वापरत आहेत. हे वाईट आहे. "

  • 'कृपा करुन सुशांतसोबत स्वत:ची तुलना करणे थांबवा'

समीरने पुढे आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'एका मृत व्यक्तीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चालवणे बंद करा. किमान इतका आदर द्या. आणि कंगना कृपा करुन सुशांतशी स्वतःची तुलना करणे थांबव. आउटसाइडर असूनदेखील त्यांनी सहा वर्षांत नऊ मोठे चित्रपट दिले. देवालाच फक्त माहित आहे की त्यांनी काय साध्य केले असेल.'

  • सोशल मीडियावर ट्रोल झाल्यावर पोस्ट डिलीट केली

मात्र सोशल मीडिया यूजर्सनी ही पोस्ट पाहून समीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रोलिंगला कंटाळून त्याने आपली पोस्ट डिलीट केली आणि लिहिले, "गुड नाईट मित्रांनो आणि ट्रोलिंगचा पहिला अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद. मला वाटते की मला बरेच काही शिकायला मिळाले आहे."

View this post on Instagram

Apologies and love to all. ❤️

A post shared by Samir Soni (@samirsoni123) on Jul 19, 2020 at 12:42pm PDT

  • मुलाखतीत काय म्हणाली होती कंगना?

कंगनाने मुलाखतीत आरोप लावला होता की, आदित्य चोप्राने सुशांतसोबत काम करणे बंद केले होते आणि मित्र करण जोहरसोबत मिळून रणनीती आखून सुशांतला (ड्राइव्ह या चित्रपटाद्वारे) फ्लॉप कलाकार ठरवले होते. कंगना पुढे म्हणाली होती, 'या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मी फक्त गमावू शकते. कारण मला माहितीये, उद्या ही मूव्ही माफिया गँग बाहेरून आलेल्या तापसी पन्नू, स्वरा भास्कर यांसारख्या कलाकारांना समोर आणेल. आणि हे कलाकार फक्त कंगनालाच घराणेशाहीचा त्रास होतो पण आमचे करण जोहरवर प्रेम आहे असे म्हणतील. जर तुम्हाला करण जोहर इतका आवडतो, तर तुम्ही बी ग्रेड अभिनेत्री का आहात?  तुमचं पूर्ण अस्तित्वच घराणेशाहीचा पुरावा आहे. या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही खूश आहात हे मला का सांगताय? मला माहितीये की भविष्यात असंच होईल आणि संपूर्ण सिस्टम मला वेडं ठरवेल”, असे मत कंगनाने व्यक्त केले होते. 

  • तापसीने दिले होते कंगनाला प्रत्युत्तर 

रविवारी ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तापसीने कंगनाला प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली - 'करण जोहर मला आवडतो असे मी कुठेही म्हटले नाही. त्याचप्रमाणे करण जोहरचा मला राग येतो असेही मी म्हटले नाही. माझे अस्तित्व माझ्या दिसण्यावरून आहे असा विचार मी अजिबात करत नाही. मीसुद्धा संघर्ष केलाय पण फक्त त्याची मार्केटिंग कधी केली नाही. माझ्या आतापर्यंतच्या कोणत्याच चित्रपटांची निर्मिती कंगना म्हणते त्या माफिया गँगने केली नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी मी एखाद्याच्या मृत्यूचा फायदा उचलू शकत नाही. या इंडस्ट्रीने मला माझी ओळख आणि पोट भरण्यासाठी खूप काही दिले आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीसोबत मी इतक्या कटू पद्धतीने वागू शकत नाही.'