आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • After The Announcement Of Aamir, There Will Be A Competition To Book The Release Date In Other Stars, Emphasis Will Be On Eid, Deepawali, August 15 And January 26

अ‍ॅडव्हान्स बुकिंग:आमिरच्या घोषणेनंतर लागली विशेष तारखेसाठी स्पर्धा; ईद, दिवाळी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारीसाठी निर्मात्यांची धडपड

अमित कर्ण, मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • पुढील वर्षी 26 जानेवारीला होऊ शकते रणबीर, विकी, जॉनची टक्कर
 • पु़ढील वर्षी 15 ऑगस्टला जॉन अब्राहम आणि अजय देवगण आणू इच्छितात त्यांचा चित्रपट

आमिर खानचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटची नुकतीच घोषणा केली. हा चित्रपट आता या ख्रिसमसला नव्हे तर पुढच्या वर्षी ख्रिसमसला येणार आहे. त्यामुळे आता इतर कलाकार आणि निर्मात्यांमध्ये पुढील वर्षाच्या विशेष तारखा बुक करण्यासाठी स्पर्धा लागली आहे. अनेकजण लवकरात लवकर 2021 च्या ईद, दिवाळी, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या तारखा बुक करण्यात लागले आहेत. तर जाणून घ्या कोणता चित्रपट कधी येईल.

 • जॉन व्हर्सेस अजय

15 ऑगस्टच्या जवळपास एक आठवडा रिकामा आहे. यावेळेत जॉनचा ‘सत्यमेव जयते 2’ आणि अजय देवगणचा “मैदान’ रिलीज होऊ शकतात.

 • 26 जानेवारीसाठी तयार आहेत दोन स्टार्स

26 जानेवारी रोजी रणबीर कपूरच्या चित्रपटाची टक्कर विक्की कौशल ‘सरदार उधम सिंह’सोबतही होऊ शकते. याच दिवशी जॉन अब्राहम आपला ‘मुंबई सागा’ घेऊन येऊ शकतो. आधी या तारखेवर अक्षयचा ‘बच्चन पांडे’ येणार होता. मात्र त्याची शक्यता कमी आहे कारण अक्षय पुढचे दोन महिने ‘बेलबॉटम’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यानंतर तो ‘पृथ्वीराज चौहान’चे शूटिंग करणार आहे. तो दिवाळीला रिलीज होणार आहे.

 • 'ब्रह्मास्त्र’चे 12 तासांचे चित्रीकरण तयार आहे

'ब्रह्मास्त्र’ पुढच्या वर्षी 26 जानेवारीला रिलीज व्हावा अशी रणबीर कपूरची इच्छा आहे. चित्रपटासाठी अयान मुखर्जीने आतापर्यंत 12 तासांचे चित्रीकरण केले आहे. तो पुढेही आणखी कंटेंट शूट करू इच्छित आहे. मात्र, रणबीर त्याला नकार देत आहे. 12 तासांच्या चित्रीकरणातून एडिट करून अडीच तासांचा चित्रपट आधी तयार करावा, नंतर पुढचे चित्रीकरण करावे असे रणबीरचे म्हणणे आहे.

 1. आमिरने घेतला समजूतदारपणाचा निर्णय

आमिरने विचारपूर्वक पुढच्या वर्षाची तारीख निवडली आहे. ताे ईद किंवा दिवाळीलाही रिलीज करू शकला असता, मात्र त्याने ही तारीख मोठ्या कलाकारांसाठी सोडली. वितरक राज बंसलदेखील आमिरच्या या पुढाकाराला स्मार्ट निर्णय असल्याचे सांगतात. ते म्हणतात, आमिर सध्या लोकेशनच्या शोधात आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तुर्की आणि भारतात परिस्थिती सामान्य झाल्यावरच शूटिंग सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...