आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिमाचा प्रवास:3 हजार मुलींमधून 'परदेस'साठी झाली होती महिमाची निवड, अपघातानंतर चेहऱ्यातून निघाले होते 67 काचेचे तुकडे

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 13 सप्टेंबर 1973 रोजी दार्जिलिंग, पश्चिम बंगालमध्ये महिमाचा जन्म झाला.

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीने ब्रेस्ट कॅन्सरशी यशस्वी लढा दिला आहे. आणि आता ती पुन्हा एकदा कामावर परतली आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी अलीकडेच एक व्हि़डिओ शेअर करुन महिमाच्या आजारपणाबद्दल खुलासा केला होता. त्यांनी आपल्या आगामी चित्रपटात भूमिका देण्यासाठी महिमाला अमेरिकेतून फोन केला होता. एका मुलाखतीत महिमासुद्धा तिच्या आजारणाबद्दल बोलली आहे. स्क्रिनिंगच्यावेळी महिमाला आपल्याला कॅन्सर असल्याचे कळले होते. तिने वैदयकीय उपचार घेऊन त्याजागेवरील कँसर सेल हटविल्या आहेत. महिमा आता 48 वर्षांची आहे, 1997 मध्ये आलेल्या 'परदेस' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. महिमाचा सुरुवातीचा प्रवास हा एखाद्या परीकथेसारखा होता, पण या प्रवासात तिला अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले. कसा आहे तिचा प्रवास जाणून घेऊया-

आमिर खानसोबत जाहिरातीत झळकली होती महिमा
13 सप्टेंबर 1973 रोजी दार्जिलिंग, पश्चिम बंगालमध्ये महिमाचा जन्म झाला. तिने 1997 मध्ये डायरेक्टर सुभाष घईच्या 'परदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता. महिमाचे खरे नाव ऋतू चौधरी आहे. महिमा हे नाव तिला सुभाष घई यांनी दिले होते. महिमा 90 च्या दशकाच्या सुरुवातीला टीव्हीवर जाहिरात करायची. यामध्ये आमिर खान आणि ऐश्वर्यारायसोबत तिने केलेली जाहिरात खुप प्रसिध्द आहे. यासोबतच तिने टीव्ही चॅनलवर व्हिजे म्हणूनही काम केले आहे.

दिग्दर्शकाची नजर पडली आणि 'परदेस'ची नायिका बनली
त्यावेळी सुभाष घई त्यांच्या 'परदेस' या चित्रपटासाठी एका फ्रेश चेह-याच्या शोधात होते. यासाठी त्यांनी 3000 मुलींच्या ऑडीशन घेतल्या होत्या. मात्र एका कार्यक्रमात त्यांची नजर महिमावर पडली आणि त्यांचा शोध संपला.

महिमाला पहिल्या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट अॅक्ट्रेस डेब्यू पुरस्कार मिळाला. महिमाने तिच्या अभिनय कारकिर्दीत जवळपास 34 चित्रपटांमध्ये काम केले आहे 'परदेस' सिनेमानंतर 'दाग द फायर'मध्येसुध्दा महिमाने चांगला अभिनय केला होता. 'धडकन' चित्रपटात महिमाने सेकंड लीड साकारली होती. तिने कुरुक्षेत्र, लज्जा, दिल है तुम्हारा, ओम जय जगदीश आणि धडकन सारख्या डझनभर चित्रपटांमध्ये काम केले तिला करिअरच्या सुरुवातीच्या काळात चांगली लोकप्रियता मिळाली. मात्र ती आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करु शकली नाही.

अपघातातून थोडक्यात बचावली होती महिमा
1999 मध्ये 'दिल क्या करे'च्या शूटिंगदरम्यान महिमा चौधरीचा भीषण अपघात झाला होता. शूटिंगवरून परतत असताना महिमाची कार ट्रकवर आदळली आणि तिच्या चेहऱ्यात काचा घुसल्या होत्या. एका मुलाखतीदरम्यान महिमाने सांगितले होते की, त्यावेळी मी माझा मृत्यू जवळून पाहिला होता. कोणीही मला रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली नाही. आरशात माझा चेहरा पाहिल्यावर मला धक्काच बसला. जेव्हा माझ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा माझ्या चेहऱ्यावरून 67 काचेचे तुकडे काढण्यात आले होते.

टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत होते अफेअर
टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत महिमाचे दिर्घकाळ अफेअर सुरु होते. दोघे जवळजवळ सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, असे म्हटले जाते. पेससोबतच्या अफेअरमुळे तिचे चित्रपट करिअर धोक्यात आले होते. परंतु नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर चर्चा रंगली होती की, लिएंडर महिमासोबतच मॉडेल रिया पिल्लईला डेट करत होता. हे समजल्यानंतर महिमा लिएंडरपासून वेगळी झाली.

सहा वर्षांनंतर मोडला संसार
महिमाने 2006 मध्ये आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले होते. बॉबीसोबत लग्न होण्याच्या काही दिवसांनंतरच तिने प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली. यानंतर मीडियामध्ये चर्चा होती की, महिमा लग्नापुर्वीच प्रेग्नेंट असल्यामुळे तिने तात्काळ लग्न केले. परंतू महिमाने ही गोष्ट कधीच मान्य केली नाही. महिमा आणि बॉबीला एक मुलगी आहे, तिचे नाव आर्यना आहे. परंतू आता हे दोघं वेगळे झाले आहेत. मुलीचा ताबा महिमाकडे आहे.

आता कुठे आहे महिमा?

महिमा शेवटची 2016 मध्ये आलेल्या 'डार्क चॉकलेट' या चित्रपटात झळकली होती. सध्या महिमा अनुमप खेर यांच्यासोबत द सिग्नेचर या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. ती आपल्या मुलीसोबत मुंबईत वास्तव्याला आहे. पती बॉबीपासून वेगळी झाल्यानंतर ती आता मुलीचा एकटीने सांभाळ करतेय.

बातम्या आणखी आहेत...