आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मालकाला गमावल्याचे दुःख:सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याला घरभर शोधतोय त्याचा लाडका 'फज', व्हिडीओ व्हायरल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडिायवर फजचे काही व्हिडीओ आणि फोटोत ज्यात तो दुःखी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

आपल्या प्रियजनांना गमावण्याची वेदना-दुः काय असतं, हे फक्त माणसालाच नव्हे तर प्राण्यांनाही समजतं. हेच कारण आहे की सुशांत सिंह राजपूत हे जग सोडून गेल्यापासून त्याचा लाडका  कुत्रा फजचे अश्रू थांबत नाहीयेत. सोशल मीडिायवर फजचे काही व्हिडीओ आणि फोटोत ज्यात तो दुःखी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सुशांतला घरभर शोधतोय फज 

एका व्हिडीओमध्ये फज सुशांतचा घरभर शोध घेताना दिसतोय. तर आणखी एका व्हिडीओत मोबाइल स्क्रिनवर तो सुशांतचा फोटो बघताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये काही क्षणानंतर फज मोबाइलची स्क्रीन प्रेमाने चाटतो आणि त्यानंतर तोंड फिरवतो असंही दिसतयं.

  • मनवीर गुर्जरने शेअर केला फोटो

'बिग बॉस' फेम मनवीर गुर्जरने 18 जून रोजी सुशांत आणि फज यांच्या फोटोसह ट्विट केले होते. मनवीरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आज तुझी किंमत कोणालाही नसली तरी याला आहे."

  • सुशांतने फजच्या नावावर एक भावनिक पोस्ट लिहिली होती

फज हा सुशांतचा अतिशय लाडका होता. दोन वर्षांपूर्वी त्याने फजच्या नावी एक भावूक पोस्ट लिहिली होती. सुशांतने लिहिले होते, "जर तू मला आठवणीत ठेवलंस तर इतरांना माझा विसर पडला तरी मला पर्वा नाही. माय लव्ह फज', असे सुशांतने लिहिले होते. 

  • आता कुठे आहे फज?

सुशांतच्या आठवणीने व्याकूळ फजने खाणेपिणे सोडले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी अफवा सोमवारी पसरली होती. पण पिंकविलाने सुशांतच्या निकटवर्तीयांशी यासंदर्भात विचारणा केली असता, फजच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे. सोबतच फज आणि सुशांतचे इतर चार डॉगी ठिक असून ते त्याच्या पावना हाऊसमध्ये असल्याचे  समजते.  

0