आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार मनोज मुंतशीर 2018 मध्ये आलेल्या त्यांच्या 'मेरी फितरत है मस्ताना' या पुस्तकामुळे वादात अडकले होते. या पुस्तकातील कविता 'मुझे कॉल करना' ही रॉबर्ट जे लेवरी यांच्या 2007 मध्ये आलेल्या 'कॉल मी'ची कॉपी असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तेव्हापासूनच ते युझर्सच्या निशाण्यावर आहेत. आता मनोज यांच्यावर अक्षय कुमार स्टारर 'केसरी' या चित्रपटातील 'तेरी मिट्टी' हे गाणे कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनोज मुंतशीर यांनी 'तेरी मिट्टी' हे गाणे 2005 मध्ये आलेल्या एका पाकिस्तानी गाण्यातून चोरले असल्याचे म्हटले जात आहे. या आरोपांमुळे मनोज मुंतशीर भडकले आहेत. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, जर 'तेरी मिट्टी' गाणे कुठून कॉपी केल्याचे सिद्ध झाले तर लिखाण कायमस्वरुपी सोडून देईल.
मनोज मुंतशीर यांनी या प्रकरणावर ई टाइम्सला मुलाखत दिली. त्यांनी सांगितले की, 'जे कोणी माझ्यावर आरोप करत आहेत, त्यांनी हे देखील तपासून घ्यावे की तो व्हिडिओ 'केसरी' चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही महिन्यांनी अपलोड करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी हे सुद्धा लक्षात घ्यावे की, ज्या गाण्याविषयी बोलले जात आहे, ते पाकिस्तानी गायकाने नव्हे तर आपल्या लोकगायिका गीता रबारीने गायले आहे. तुम्ही त्यांना देखील कॉल करुन याची खातरजमा करुन घेऊ शकता.'
पुढे मनोज म्हणाले, जर कोणाला त्यांच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये किंवा इतिहासातील गोष्टी पुन्हा एकदा योग्य पद्धतीने दाखवले म्हणून त्यात काही समस्या असतील तर ते त्यांच्याशी वाद घालू शकतात. परंतु सशस्त्र दलांसाठी राष्ट्रगीत बनलेल्या गाण्याचा अपमान करू नका. मनोज मुंतशीर पुढे म्हणाले, 'जर मी 'तेरी मिट्टी ' हे गाणे आणि इतर गाणी चोरली असे सिद्ध झाले तर मी कायमचे लिखण थांबवेन.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.