आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावरून:'धाकड' फ्लॉप झाल्यानंतर मुळगावी पोहोचली कंगना रनोट, कुटुंबासोबत एन्जॉय केली पिकनिक

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना रनोटने आपल्या गावी नवीन घर बांधले आहे

अभिनेत्री कंगना रनोटचा 'धाकड' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉपच्या यादीत जमा झाला आहे. चित्रपट अपयशी ठरल्यानंतर कंगना मुंबईहून तिच्या मुळगावी हिमाचल प्रदेशात गेली आहे. येथे मनालीमध्ये ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतेय. नुकतीच तिने कुटुंबासोबत पिकनिकचा आनंद घेतला. कंगनाने या पिकनिकचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. कंगनाने शेअर केले आहेत पिकनिकचे फोटो

पिकनिकचे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, "माझ्या आवडत्या ठिकाणी माझ्या कुटुंबासोबत ब्रेक डे खूप आवश्यक आहे... आणि हवामानही खूप छान आहे. हा खूप सुंदर दिवस आहे."

छायाचित्रांमध्ये कंगनाने पोल्का डॉट रेड ड्रेस आणि टोपी घातलेली दिसत आहे.
छायाचित्रांमध्ये कंगनाने पोल्का डॉट रेड ड्रेस आणि टोपी घातलेली दिसत आहे.
बहीण रंगोली चंदेलसोबत अभिनेत्री
बहीण रंगोली चंदेलसोबत अभिनेत्री
कंगना तिच्या आईवडिलांसोबत पिकनिक एन्जॉय करताना
कंगना तिच्या आईवडिलांसोबत पिकनिक एन्जॉय करताना
आपल्या भाच्यासोबत (कंगनाची थोरली बहीण रंगोलीचा मुलगा) खेळताना
आपल्या भाच्यासोबत (कंगनाची थोरली बहीण रंगोलीचा मुलगा) खेळताना
अभिनेत्रीने तिच्या आवडत्या ठिकाणाचे फोटो शेअर केले आहेत
अभिनेत्रीने तिच्या आवडत्या ठिकाणाचे फोटो शेअर केले आहेत
आईला मिठी मारताना अभिनेत्रीने फोटो क्लिक केला.
आईला मिठी मारताना अभिनेत्रीने फोटो क्लिक केला.
कंगनाचे वडील आईला घास भरवताना दिसले.
कंगनाचे वडील आईला घास भरवताना दिसले.

कंगना रनोटने आपल्या गावी नवीन घर बांधले आहे

कंगनाने नुकतेच तिच्या मूळ गावी म्हणजेच हिमाचल प्रदेशातील मनाली येथे नवीन घर घेतले आहे. गुरुवारी तिने आपल्या नवीन घराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. डोंगरांच्या मधोमध असलेल्या तिच्या आलिशान घराची आतील छायाचित्रे शेअर करताना, हे घर पहाडी स्टाइलमध्ये रिव्हर स्टोनपासून बांधले असल्याचे कंगनाने सांगितले.

कंगनाने तिच्या नवीन घराचे फोटो शेअर केले आहेत
कंगनाने तिच्या नवीन घराचे फोटो शेअर केले आहेत

कंगनाचे आगामी प्रोजेक्ट्स
कंगनाचा 'धाकड' हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. अर्जुन रामपाल स्टारर चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. कंगना सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. तिच्याकडे 'तेजस' आणि 'मणिकर्णिका रिटर्न्स' सारखे चित्रपट आहेत. तसेच, ती इमरजेंसी या आगामी पॉलिटिकल ड्रामामध्येही बिझी आहे.

बातम्या आणखी आहेत...