आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ट्रेंडिंग:अनुष्का-विराटच्या घटस्फोटाच्या फेक न्यूजनंतर ट्विटरवर ट्रेंड झाले #VirushkaDivorce, चाहत्यांनी मीम्सच्या माध्यमातून दिली 'विरुष्का'ला साथ

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे प्रकरण 2016 मध्ये आलेली एक बातमी पुन्हा व्हायरल झाल्याने सुरु झाले आहे.
Advertisement
Advertisement

'पाताल लोक' ही वेब सीरिज सुरु झाल्यापासून अनुष्का शर्माला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.  याच दरम्यान विराट आणि अनुष्काच्या घटस्फोटाच्या बातम्यादेखील सोशल मीडियावरही चर्चेत आहेत. ही बातमी इतकी पसरली की ट्विटरवर #VirushkaDivorce हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. हे प्रकरण 2016 मध्ये आलेली एक बातमी पुन्हा व्हायरल झाल्याने सुरु झाले आहे. त्या बातमीत विराट आणि अनुष्का वेगळे होत असल्याचे सांगण्यात आले होते.

ट्रेंड कसा सुरू झाला?

अनुष्का शर्माच्या होम प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘पाताल लोक’ या वेब सीरिजला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे, काहींना ही वेब सीरिज पसंत पडली नाही. या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी करताना भाजपचे आमदार नंदकिशोर शर्मा यांनी म्हटले की, अशी सीरिज तयार केल्याने विराटने अनुष्काला घटस्फोट द्यायला हवा. यानंतर या दोघांच्या लग्नाआधीची एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. व्हायरल बातमी फेब्रुवारी  2016 ची आहे, त्यानंतर हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

2016 मध्ये प्रकाशित झालेले आर्टिकल

ट्विटरवर आला मीम्सचा पूर 

काही लोकांना विराट अनुष्काच्या घटस्फोटाच्या बातमीने धक्का बसला तर काही जण मीम्सच्या माध्यमातून अशी बातमी पसरवणा-यांना योग्य प्रत्युत्तर देत आहेत. बॉलिवूड चित्रपटांच्या हिट संवादांद्वारेही अनेकांनी विराटची प्रतिक्रिया दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

लग्नाआधी झाले होते ब्रेकअप

2013 मध्ये अनुष्का विराटची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. दोघांनी काही काळ आपले नाते जगापासून लपवून ठेवले होते. त्यानंतर मात्र हे दोघे अनेक ठिकाणी सोबत दिसू लागले. काही वर्षांनी दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले. त्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाल्याची त्याकाळी चर्चा झाली होती. एका सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या अपयशाचे खापल अनुष्कावर फोडण्यात आले होते. ज्यानंतर अनुष्काला ब-याच टीकेला सामोरे जावे लागले. नंतर विराटने अनुष्काला पाठिंबा दर्शविला. काही काळाने हे दोघे पुन्हा एकत्र आले आणि यावेळी हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले.

विराटने अनुष्काचा बचाव केला होता.

11 डिसेंबर 2017 रोजी अनुष्का विराटने लग्न केले. इटलीमध्ये झालेल्या लग्नात जवळचे मित्र आणि दोघांचे नातेवाईक सामील झाले होते. सध्या लॉकडाऊनमुळे विरुष्का आपल्या घरात क्वालिटी वेळ घालवत आहेत. 

Advertisement
0