आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा नकारात्मक भूमिका:‘आश्रम’च्या यशानंतर आता दक्षिणेत धमाल करणार बॉबी देओल, बिग बजेट चित्रपटात साकारणार खलनायक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट बाहुबलीच्या टक्करचा असेल, असे सांगण्यात येत आहे.

'आश्रम' या वेब सीरिजमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्यानंतर अभिनेता बॉबी देओलला आता अनेक मोठे प्रोजेक्ट ऑफर होत आहेत. आता बॉबी दक्षिणेकडे वळला आहे. बॉबी दक्षिणेच्या एका चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची बातमी आहे.

मोठ्या बजेटच्या या चित्रपटात साऊथचा एका मोठा स्टार मुख्य भूमिकेत दिसेल. मात्र तो स्टार कोण आहे, हे अजून समोर आले नाही. मात्र बॉबीला खलनायकाच्या पात्रासाठी विचारणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची टीम प्रोजेक्ट साइन करण्याआधी माहिती घेत आहे. हा चित्रपट बाहुबलीच्या टक्करचा असेल, असे सांगण्यात येत आहे.

बॉबीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर तो काही दिवसांपूर्वीच आश्रम या गाजलेल्या वेब सीरिजच्या दोन्ही पर्वात झळकला. दिग्दर्शक प्रकाश झा यांची ही वेब सीरिज एमएक्स प्लेअरवर रिलीज झाली होती.

बातम्या आणखी आहेत...