आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • After The Trailer Of 'Sadak 2', Now The Song Tum Se Hi Also Had To Face The Wrath Of Sushant's Fans, Three Times More Dislikes Than Likes

अडचणीत स्टारकिड्सचा चित्रपट:'सडक 2' च्या ट्रेलरनंतर आता 'तुम से ही' गाण्याकडे सुशांतच्या चाहत्यांनी फिरवली पाठ,  लाइक्सपेक्षा तीन पट जास्त मिळाले डिसलाइक्स

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सडक 2 च्या ट्रेलरनंतर महेश भट्ट यांना पुन्हा झटका, गाण्याला प्रेक्षकांची नापसंती

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिज्मवरून वाद सुरू झाला, त्याचा परिणाम महेश भट्ट आणि या चित्रपटातील स्टारकास्ट आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त यांच्यावरही झाला आहे. सुशांत प्रकरणात चिडलेल्या चाहत्यांनी महेश भट्ट यांच्या 'सडक 2' या चित्रपटाच्या ट्रेलरला नापसंती दर्शवली. ट्रेलरनंतर आता चित्रपटाचे गाणे समोर आल्यानंतरही हीच परिस्थिती आहे.

15 ऑगस्ट रोजी 'सडक 2' या चित्रपटातील 'तूम से ही' हे पहिले गाणे समोर आले आहे. हे गाणे यूट्यूबवर आल्यानंतर त्याला 2.3 मिलियन व्ह्यूज मिळाले. त्यापैकी 50 हजार लोकांनी व्हिडिओला लाइक केले तर 1.9 मिलियन लोकांनी आपली नापसंती दर्शवली आहे. सोनी म्युझिक इंडियाने हे गाणे यूट्यूबवर प्रसिद्ध केले आहे.

'सडक 2' या चित्रपटातील हा रोमँटिक ट्रॅक 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. अंकित तिवारीच्या कंपोझिशनमध्ये बनलेल्या या गाण्याला अंकित तिवारी आणि लीना बोस यांनी स्वरसाज चढवला आहे. तर गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांचे आहेत. आलिया आणि आदित्यवर चित्रित झालेले हे एक रोमँटिक गाणे आहे.

तुम से ही गाने या गाण्याला लाइक्सच्या तुलनेत तीनपट जास्त डिसलाइक्स मिळाले आहेत.
तुम से ही गाने या गाण्याला लाइक्सच्या तुलनेत तीनपट जास्त डिसलाइक्स मिळाले आहेत.
  • सडक 2 ट्रेलर जगातील तिसरा सर्वाधिक नापसंत व्हिडिओ ठरला

गाण्याआधीच सडक 2 च्या ट्रेलरला चाहत्यांचा रोष सहन करावा लागला. त्याला आतापर्यंत 10 मिलियनहून अधिक डिसलाइक्स मिळाले आहेत. त्यानंतर आता गाणेदेखील जगभरातील सर्वाधिक नापसंत व्हिडिओंच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर पोहोचले आहे.

10 मिलियन डिसलाइक्स मिळवून हा ट्रेलर सर्वाधिक नापसंत व्हिडिओच्या यादीत आला आहे.
10 मिलियन डिसलाइक्स मिळवून हा ट्रेलर सर्वाधिक नापसंत व्हिडिओच्या यादीत आला आहे.
  • ट्रेलरला डिसलाइक्स मिळाल्यानंतर पूजा भटने दिली होती प्रतिक्रिया

ट्रेलरला सर्वाधिक डिसलाइक मिळाल्यानंतर पूजा भट्टने यावर प्रतिक्रिया दिली होती. ‘प्रेम करणारे आणि राग करणारे लोकं हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही दोघांनीही आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिलात आणि चित्रपट टॉप ट्रेंडमध्ये असल्याची खात्री करुन दिली त्याबद्दल तुमचे आभार’ असे पूजा भट्टने ट्विटमध्ये म्हटले होते.

  • हा चित्रपट येत्या 28 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे

महेश भट्ट दिग्दर्शित 'सडक 2' हा चित्रपट 1991 मध्ये आलेल्या संजय दत्त, पूजा भट्ट स्टारर 'सडक'चा सिक्वेल आहे. हा चित्रपट 28 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉट-स्टारवर रिलीज होणार आहे. चित्रपटात आलिया भट, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर, गुलशन ग्रोवर, जीशू सेनगुप्ता यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच ट्रेलर रिलीज झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...