आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऍटली कुमारच्या 'जवान' या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. या चित्रपटात शाहरुख खानचा अभिनय पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. जवानमध्ये शाहरुखसोबत साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा आणि विजय सेतूपती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात टीव्ही इंड्स्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.
'मॅरिड वुमन' आणि 'असुर' यांसारख्या ओटीटी शोजमध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेली रिद्धी डोगरा 'जवान'च्या कलाकारांमध्ये सामील झाली आहे. या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारणार असून, अधिक तपशील सस्पेन्स राखण्यासाठी गुपित ठेवण्यात आले आहे.
सूत्राच्या माहितीनुसार, रिद्धी डोगरा चित्रपटात एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत दिसणार असून, तिने आपल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. रिद्धीने मुंबई आणि चेन्नईचे शेड्यूल पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे जवानपूर्वी रिद्धीने सलमान खान स्टारर टायगर 3 हा चित्रपटदेखील साइन केला आहे.
सिद्धीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती टीव्ही आणि ओटीटीवर कार्यरत आहेत. तिला वो अपना सा, मर्यादा : लेकीन कब तक यासारख्या मालिकांसाठी ओळखले जाते. ती अलीकडेच थेरपिस्ट या शॉर्टफिल्ममध्ये झळकली होती. या शॉर्ट फिल्ममधील तिच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.