आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वराचा गृहप्रवेश:अडीच वर्षांनंतर नुतनीकरण झालेल्या घरात पोहोचली स्वरा भास्कर, 7 तास चालली गृहप्रवेशाची 7 प्रकारची पूजा

अमित कर्ण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वरा सांगते - ही माझी पहिली पूजा असल्याने मला मोठे झाल्यासारखे वाटले

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर अडीच वर्षांनंतर तिच्या नुतनीकरण झालेल्या घरात परतली आहे. तिने आपल्या नवीन घरासाठी 7 तासांची गृहप्रवेशाची पूजा देखील केली. स्वरा म्हणते, "मी मुंबईत माझ्या घरी कधीच शांतपणे पूजा केली नव्हती. हे नूतनीकरण बरेच दिवस सुरु होते. याकाळात माझ्या आयुष्यात आणि जगात इतके बदल झाले आहेत की मी या घरी परतण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. हे परतणे अर्थपूर्ण आणि विशेषही होते.'

आई करायची गृहप्रवेशाची विशेष पूजा
स्वरा सांगते - 'माझे वडील नौदलात असल्याने त्यांची सतत बदली होत असायची. मला आठवते की आम्ही ज्या शहरात जायचो, तेथील घरात माझी आई विधीवत पूजा करायची आणि ती दुधाला उकळी आणायची. हे शुभ मानले जाते.'

स्वरा पुढे सांगते, 'मलाही असेच काहीतरी करायचे होते आणि शेवटी मला एक गुरुजी मिळाले. त्यांनी एकाच वेळी सात पूजा केल्या. त्यांनी गणेश पूजा, सत्यनारायण पूजा, रुद्राभिषेक आणि शेवटी हवन आणि गृह प्रवेश केला. हा एक उत्साहवर्धक अनुभव होता. ही माझी पहिली पूजा असल्याने मला मोठे झाल्यासारखे वाटले.'

बातम्या आणखी आहेत...