आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एका स्टारकिडचे पदार्पण:वरुण धवननंतर आता करण जोहर त्याची पुतणी अंजिनी धवनला करणार लाँच, 2022 मध्ये रिलीज होऊ शकतो चित्रपट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोइंग

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने 2012 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, त्यानंतर आता करण लवकरच त्याची पुतणी अंजिनी धवनला इंडस्ट्रीमध्ये लॉन्च करणार आहे. अंजिनी ही सिद्धार्थ धवनची मुलगी आहे. सिद्धार्थ हा डेव्हिड धवनचे भाऊ अनिल धवन यांचा मुलगा आहे. या स्टारकिडने तिच्या पहिल्या चित्रपटाची तयारीही सुरू केली आहे.

नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, करण जोहर अंजनी धवनला धर्मा या आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीमध्ये लाँच करणार आहे. पदार्पणापूर्वी अंजनीने क्लासिकल आणि वेस्टन डान्सची ट्रेनिंग सुरु केली आहे.

अंजिनीला आल्या अनेक चित्रपटांच्या ऑफर
रिपोर्टनुसार, धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटाव्यतिरिक्त अंजिनीला अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. मात्र सध्या ती तिच्या पहिल्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करत आहे. हा चित्रपट 2022 च्या अखेरीस किंवा 2023 च्या सुरुवातीला प्रदर्शित होईल.

वरुण धवनच्या चित्रपटासाठी केले काम
'स्टुडंट ऑफ द इयर'मधून पदार्पण करणाऱ्या वरुण धवनने करण जोहरच्या 'माय माय इज खान' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत अंजिनीने 'कुली नं 1' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोइंग
अंजिनी धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिची ग्लॅमरस छायाचित्रे शेअर करते जी तिच्या चाहत्यांना पसंत पडतात. इन्स्टाग्रामवर तिचे 1 लाख 63 हजार फॉलोअर्स आहेत. अंजिनी धवन आणि जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर या दोघी बेस्टफ्रेंड आहेत आणि अनेकदा एकत्र फोटो शेअर करतात.

बातम्या आणखी आहेत...