आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्ती कपूर यांच्या लेकीच्या लग्नाची चर्चा:वरुण धवननंतर आता श्रद्धा कपूर लवकरच बांधणार लग्नगाठ, स्वतः वरुणने दिली हिंट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वरुणने रोहन आणि श्रद्धा कपूरच्या लग्नाचे एक प्रकारे संकेतच दिले आहेत.

अलीकडेच अभिनेता वरुण धवन त्याची बालमैत्रीण नताशा दलालसोबत विवाहबद्ध झाला. 24 जानेवारी रोजी अलिबागच्या द मॅन्शन हाऊस या आलिशान रिसॉर्टमध्ये दोघांचा लग्नसोहळा पार पडला. सध्या या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे वरुणच्या लग्नानंतर आता अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. इतकेच नाही तर स्वतः वरुणनेच श्रद्धाच्या लग्नाची हिंट दिली आहे.

झाले असे की, लग्नानंतर विविध माध्यमांतून वरुण आणि नताशा या नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यामुळे वरुणदेखील शक्य तितक्या जणांना रिप्लाय देतोय. बुधवारी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचेदेखील आभार मानले होते. यामध्येच प्रसिद्ध छायाचित्रकार रोहन श्रेष्ठा याच्या पोस्टला वरुणने रिप्लाय दिला आहे. विशेष म्हणजे वरुणने यावेळी रोहन आणि श्रद्धा कपूरच्या लग्नाचे एक प्रकारे संकेतच दिले आहे.

वरुणला लग्नाच्या शुभेच्छा देताना रोहन म्हणाला, 'वरुण आणि नताशा खूप शुभेच्छा. एकदा का तुम्हाला समजलं की मग सारं काही आपोआप समजू लागतं. वरुण धवन तू नशीबवान आहेस.' त्यावर वरुणनेदेखील त्याला रिप्लाय दिला.'खरंच मी नशीबवान आहे. आशा आहे तू सुद्धा या सगळ्यासाठी तयार असशील', असे वरुण रोहनला म्हणाला. विशेष म्हणजे वरुणचा हा रिप्लाय पाहून नेटकऱ्यांनी याचा संबंध थेट श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठाच्या लग्नाशी जोडला आहे. वरुणने रोहनची ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली होती.

रोहन श्रेष्ठासोबत श्रद्धा कपूर - फाइल फोटो
रोहन श्रेष्ठासोबत श्रद्धा कपूर - फाइल फोटो

रोहनसोबत श्रद्धाच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक काळापासून आहे. पण, या दोघांनीही त्यांच्या नात्याला अत्यंत सिक्रेट ठेवले आहे. श्रद्धाला अनेकदा रोहनसोबत बघितले गेले आहे. अनेक इव्हेंट्समध्ये ते सोबत दिसले आहेत.

बातम्या आणखी आहेत...