आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • After Winning The Beauty Pageant, Reena Rai Became A Part Of The Punjabi Film Industry, Was Present With Deep Sandhu At The Time Of The Accident.

अपघातातून थोडक्यात बचावली:सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर रीना रायने केली होती पंजाबी चित्रपटसृष्टीत एंट्री, अपघाताच्या वेळी दीप सिद्धूसोबत कारमध्ये होती हजर

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी रीना अमेरिकेहून भारतात आली होती.

पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याचा कार अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी दिल्लीहून पंजाबला जाताना दीप प्रवास करत असलेल्या कारची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जबरदस्त होती, की गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताच्या वेळी दीप त्याची गर्लफ्रेंड रीना रायसोबत प्रवास करत होता. कुंडली-मानेसर-पलवल (केएमपी) एक्स्प्रेस वेवर पिपली टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर दीप सिद्धू सोशल मीडियावर चर्चेत आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपला जामीन मंजूर झाला होता. दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये घडलेल्या प्रकरणातही तो आरोपी होता. लाल किल्ल्यातील हिंसाचारात शिक्षा भोगण्यापूर्वी दीप अनेक दिवस फरार होता. दीपला अटकेपासून वाचवण्यात रीनाचेही नाव होते.

विशेष म्हणजे दीपसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी रीना अमेरिकेहून भारतात आली होती. दीपने मृत्यूच्या आदल्या दिवशी गर्लफ्रेंड रीनासोबत सेलिब्रेशन केले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अपघातातून रीना थोडक्यात बचावली पण दीप मात्र वाचू शकला नाही. दीपची मैत्रीण रीना राय कोण आहे आणि ती काय करते जाणून घेऊया -

रीना राय एक पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. रीनाने तिच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि विजेतेपदही पटकावले. 2014 मध्ये, रीनाने मिस साउथ एशियाचा किताब जिंकला, त्यानंतर तिला इंडस्ट्रीत येण्याची संधी मिळाली.

काही वर्षे छोट्या भूमिका केल्यानंतर, रीना 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'रंग पंजाब' या पंजाबी चित्रपटात दिसली, या चित्रपटाने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली.

'रंग पंजाब'मध्ये रीनासोबत दीप सिद्धू मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाच्या शूटिंगपासून दीप आणि रीना यांच्यात घट्ट मैत्री झाली होती. या चित्रपटातील दोघांची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती.

दीप सिद्धू आणि रीना आगामी देसी चित्रपटातही एकत्र दिसणार आहेत, ज्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या कपलचा हा शेवटचा चित्रपट असेल, मात्र तो पाहण्यासाठी दीप आता या जगात नाही.

पंजाबी फिल्म इंडस्ट्रीशिवाय रीनाचे सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे. रीनाच्या इंस्टाग्रामवर सुमारे 13 लाख फॉलोअर्स आहेत. रीना तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी पोस्ट करत असते.

रीना 13 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी अमेरिकेतून भारतात आली होती. इथे येऊन तिने बॉयफ्रेंड दीपसोबत क्वालिटी टाइम घालवला. रीनाने दीपसोबतचा मिरर सेल्फीही शेअर केला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हरियाणातील सोनीपतमधील खारखोडाजवळ कुंडली-मानेसर-पलवल (केएमपी) एक्स्प्रेस वेवर मंगळवारी संध्याकाळी या जोडप्याचा अपघात झाला. या अपघातात रीनाला दोन ठिकाणी दुखापत झाल्याने ती जागीच बेशुद्ध झाली होती.

रीनाला खारखोड्यातीलच रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडल्यामुळे रीनाला दीपच्या मृत्यूची माहिती देण्यात आली नाही, मात्र नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला दीपच्या निधनाची माहिती कळली.

काही महिन्यांपूर्वी दीपनेही रीनासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली होती. दीपने रीनासोबतचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, "संपूर्ण जग माझ्या विरोधात असताना तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस, तू मला सुरक्षित ठेवलेस, माझा आदर केलास, मला शक्ती दिलीस, माझ्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना केलीस.'

पुढे तो म्हणाला होता, "पण माझ्या मनाला भिडणारी गोष्ट म्हणजे तू माझ्यासाठी तुझं आयुष्य थांबवलंस. तुझे इथे असणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. तुमचे प्रेम आणि समर्थन शब्दांहून अधिक आहे. माझ्याकडे तुझ्यासाठी शब्द नाहीत आणि तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो. मला एवढेच सांगायचे आहे की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे."

बातम्या आणखी आहेत...