आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही सेटवर कोरोना:अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाईन; 'अग्गबाई सासूबाई'च्या सेटवरील इतर कलाकारांची टेस्ट निगेटिव्ह

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केल्याचे समजते.

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या अग्गबाई सासूबाई या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारणा-या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. त्यांना सौम्य लक्षणे असून त्यांनी स्वतःला घरीच क्वारंटाइन केल्याचे समजते.

मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारे तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, डॉ. गिरीश ओक यांच्यासह इतर कलाकारांची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

मालिकेच्या सेटवर सर्वांच्या सुरक्षेची योग्यरित्या काळजी घेतली जात असल्याचे मालिकेच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आले.

'आई माझी काळूबाई'च्या सेटवर 22 जणांना कोरोनाची लागण

योग्य ती खबरदारी घेत मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र तरीदेखील सेटवर कोरोनाचा शिरकाव होताना दिसतोय. यापूर्वी आई माझी काळूबाई या मालिकेच्या सेटवर तब्बल 22 जणांना कोरोनाची लागण झाली होती. याच मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणा-या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान 22 सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...