आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्यावर उपासमारीची वेळ:हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत 'अग्निपथ'मध्ये झळकलेले रेशम अरोरा, म्हणाले - 'मला आर्थिक मदतीची गरज आहे’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेशम यांनी अग्निपथ, खुदा गवाह यासह अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे.

अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका वठवणारे ज्येष्ठ अभिनेते रेशम अरोरा सध्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. कोरोना आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सामान्यांसह अनेक कलाकारांवर अर्थिक संकट कोसळले. रेशम अरोरा यांच्याबाबतीतही तसेच घडले. कोरोनामुळे त्यांना काम मिळणे बंद झाले आणि आता त्यांच्या हातात काहीच काम नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय.

रेशम यांनी अलीकडेच एका मुलाखतीमध्ये त्यांना लॉकडाउनमुळे काम मिळणे बंद झाल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, ‘माझ्याकडे काहीच काम नाहीये. लॉकडाउन सुरु झाल्यापासून ही अवस्था होती. अनेकजण म्हणत आहेत की आता सर्व काही ठीक होत आहे. पण मला अजूनही कामाच्या संधी दिसत नाहीत.’

पत्नीला झाला मोतीबिंदू
रेशम यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या कुटुंबात तब्येतीच्या तक्रारी सुरु आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक आणि सोबतच मानसिक त्रास वाढला आहे. रेशम सांगतात, ‘काही वर्षांपूर्वी मी रेल्वेमधून पडलो होतो. त्यानंतर चिडिया घर मालिकेच्या चित्रीकरणावेळी काही कीटक माझ्या पायाला चावले. त्यामुळे मला हालचाल करण्यास त्रास होतो. हे होत नाही तोच पत्नीला मोतीबिंदू असल्याचे निदान झाले,’ असे रेशम म्हणाले.

जी मदत मिळाली ती पुरेशी नाही
ते पुढे म्हणाले, ‘मला खरंच कामाची गरज आहे. CINTAA(सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) ने माझी मदत केली, पण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मला कामाची गरज आहे. मी कोलमडून गेलोय. मला आर्थिक मदतीची गरज आहे.’ रेशम यांनी अग्निपथ, खुदा गवाह यासह अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...